शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

गाव पुनर्वसनाचा तिढा मात्र कायम

By admin | Updated: July 26, 2014 01:57 IST

सिंचनाचा १०० टक्क्याजवळ अनुशेष असलेल्या गडचिरोली

कोसरी लघु प्रकल्प : ८० टक्के काम पूर्ण; प्रती हेक्टरी १२.५ लाख रूपये हवा मोबदलाडी. के. मेश्राम  मानापूर/ देलनवाडी (गडचिरोली)सिंचनाचा १०० टक्क्याजवळ अनुशेष असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी तालुक्यात कोसरी हा लघु सिंचन प्रकल्प मंजूर करण्यात आला. त्याचे ८० टक्के काम आता पूर्ण होत आले आहे. मात्र पुनर्वसनाचा तिढा अजुनही सुटलेला नाही. या प्रकल्पामुळे बाधित होणारे चव्हेला गाव स्थानांतरीत झालेले नाही. १९८० च्या वनकायद्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात सिंचन प्रकल्प निर्माण होऊ शकले नाही. २००८ मध्ये वनकायदा शिथील झाल्यावर काही लहान प्रकल्पाचे काम मंजूर करण्यात आले. यामध्ये आरमोरी तालुक्यातील कोसरी या सिंचन प्रकल्पाचाही समावेश होता. चव्हेला या १२५ लोकसंख्येच्या व ३६ कुटुंब वास्तव्याला असलेल्या गावाजवळ हा प्रकल्प होऊ घातला आहे. कोसरी-अंगारा मार्गावर मांगदा गावालगत ५ एकर जागा वसाहतीसाठी निश्चित केली होती. शासनाने ८ ते १० महिन्यात या कुटुंबाचे पुनर्वसन करून देण्याची हमी घेतली होती. परंतु हे काम पूर्णत्वास जाऊ शकले नाही. या प्रकल्पामुळे ७७५ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. चव्हेला गावाचे पुनर्वसन करण्याचे काम रखडलेले असून बाधित क्षेत्रात येणाऱ्या चव्हेला गावातील शेतकऱ्यांची ६१ हेक्टर शेतीही यात आहे. प्रती हेक्टरी १२.५० लाख रूपये मोबदला शासनाने द्यावा, तसेच घरसुध्दा शासनाने बांधून द्यावे, असे प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे आहे. प्रती कुटुंब घर बांधणीसाठी ८ लाख रूपये आणि प्रकल्पग्रस्त कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी अशी मागणी पुढे आल्यामुळे या प्रकल्पाचे काम ८० टक्के पूर्ण होऊनही पुनर्वसन रखडलेले आहे. विलासराव देशमुख पहिल्यांदा मुख्यमंत्री असताना त्यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिली होती. त्यानंतर जवळजवळ तीन मुख्यमंत्री बदललेत. परंतु पुनर्वसनाचा तोडगा शासनाला काढता आली नाही. त्यामुळे अद्याप हा प्रश्न प्रलंबितच आहे.