गावविकास आराखडा सर्वसंमतीने तयार करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:50 IST2021-02-05T08:50:58+5:302021-02-05T08:50:58+5:30

गडचिरोली पंचायत समितीत ‘आमचा गाव, आमचा विकास’ आराखडा तयार करण्याबाबत दोन दिवसीय कार्यशाळा पंचायत समितीच्या सभागृहात पार पडली. उद्घाटन ...

Village development plan should be prepared by consensus | गावविकास आराखडा सर्वसंमतीने तयार करावा

गावविकास आराखडा सर्वसंमतीने तयार करावा

गडचिरोली पंचायत समितीत ‘आमचा गाव, आमचा विकास’ आराखडा तयार करण्याबाबत दोन दिवसीय कार्यशाळा पंचायत समितीच्या सभागृहात पार पडली. उद्घाटन सभापती मारोतराव ईचोडकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी उपसभापती विलास दशमुखे हाेते. प्रमुख अतिथी म्हणून सहायक गटविकास अधिकारी सुनीता मरस्कोल्हे, विस्तार अधिकारी रामकृष्ण बोपनवार, अमोल भोयर, प्रशिक्षक भाऊराव शंभरकर उपस्थित होते.

१५ वा वित्त आयोग लागू झाला असून, कृती आराखडा प्रत्येक गावातील ज्येष्ठ व युवांना सोबत घेऊन तयार करावा. यात गावातील सर्व समस्यांचा समावेश करावा. हा आराखडा पाच वर्षे चालणार असून, पाणी पुरवठा, आरोग्य, शिक्षण, महिला बाल विकास, मागासवर्गीय विकास आदींचा समावेश करावा, अशा सूचना विलास दशमुखे यांनी दिल्या.

यावेळी सभापती मारोतराव ईचोडकर, सहायक गटविकास अधिकारी सुनीता मरस्कोल्हे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रशिक्षक दादाजी गव्हारे यांनी मानले. कार्यक्रमाला ग्रामसेवक उपस्थित होते.

Web Title: Village development plan should be prepared by consensus