शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

झुडुपी जंगलाची जमीन विकास प्रकल्पांनी वापरावी

By admin | Updated: October 16, 2016 00:56 IST

संपूर्ण देशात केवळ गडचिरोली जिल्ह्यात खास बाब म्हणून झुडूपी जंगलाची जमीन मोठ्या विकास प्रकल्पांसाठी वापरावयास मान्यता देण्यात आली आहे.

विकास खारगे यांचे निर्देश : प्रस्ताव महिनाभरात राज्य शासनाकडे सादर करागडचिरोली : संपूर्ण देशात केवळ गडचिरोली जिल्ह्यात खास बाब म्हणून झुडूपी जंगलाची जमीन मोठ्या विकास प्रकल्पांसाठी वापरावयास मान्यता देण्यात आली आहे. मोठ्या विकास प्रकल्पासाठी ही जमीन कामात येणार असल्याने सदर काम प्राधान्याने पूर्ण करावे, जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांनी झुडुपी जंगलाच्या जमिनीचे निर्वनिकरणाचे प्रस्ताव महिनाभरात राज्य शासनाकडे सादर करावे, असे निर्देश राज्याचे सचिव (वने) तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालक सचिव विकास खारगे यांनी दिले.जिल्ह्यातील विविध विकास कामांचा आढावा शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत त्यांनी घेतला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी बैठकीला आ. डॉ. देवराव होळी, आ. क्रिष्णा गजबे, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर, जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, मुख्य वनसंरक्षक पी. कल्याणकुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल, सहायक जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर आदी उपस्थित होते. गडचिरोली जिल्ह्यात अधिक भाग वनाखाली आहे. त्यामुळे उद्योग व इतर बाबींसाठी जमीन लागणार आहे. याकरिता २०१३ साली खास बाब म्हणून झुडुपी जंगलाची जमीन निर्वनीकरण करून ती इतर कामांसाठी वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. वन व महसूल विभागाने संयुक्त पडताळणी करून अशा जमिनी निश्चित कराव्यात व त्याचे प्रस्ताव सादर करावेत, यातून ११ हजार ८०० हेक्टर जमीन प्राप्त होणार आहे. अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करून याबाबतचे प्रस्ताव एक महिन्याच्या आत सादर करावे, जिल्ह्यात शासन आदेशानुसार १९५६ पूर्वी जे भूमीधारी आहेत, त्यांना भूमीस्वामी म्हणून घोषित करण्याचे प्रयोजन आहे. त्यानंतरच्या कालावधीचे दावे जिल्ह्यात आलेले आहेत. याबाबतचे उद्दिष्ट ३१ डिसेंबरपूर्वी पूर्ण करावे, असे निर्देश खारगे यांनी दिले. (प्रतिनिधी)