शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यस्थीच्या नावाखाली ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
2
“तुम्ही ७५ काय, १७५ वर्षे आरक्षण घ्या, आम्हाला गरज नाही”; बृजभूषण शरण सिंह यांचा रोख कुणाकडे?
3
Mamata Banerjee : "नाव, पत्ता सगळं माहित आहे, हिशोब तर होणारच!"; ममता बॅनर्जींची अधिकाऱ्यांना थेट धमकी
4
Latest Marathi News LIVE Updates: विरोधकांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली, फडणवीसांचा घणाघात
5
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानने ११ एप्रिलला घेतले मुंब्र्यात उपचार; जामीन अर्जावर आज सुनावणी
6
Avinash Bhosale: बिल्डर अविनाश भोसले यांना दिलासा; मालमत्तांवरील कारवाई रद्द
7
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
8
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
9
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
10
‘तुम्ही घुसखोर आहात का? हे सिद्ध करण्याची वेळ आणू नका’ म्हाडाच्या उपाध्यक्षांची नागरिकांना दमदाटी
11
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
12
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
13
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
14
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
15
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
16
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
17
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
18
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
19
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
20
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तीसाठी पीओपीचा वापर वाढला

By admin | Updated: August 30, 2016 01:04 IST

प्लास्टर आॅफ पॅरिस (पीओपी) पासून गणेश मूर्त्या बनविण्यावर निर्बंध असले तरी नगर परिषद

स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष : प्रदूषणाचा धोका; मातीने मूर्ती बनविणारे कारागीर आले अडचणीत गडचिरोली : प्लास्टर आॅफ पॅरिस (पीओपी) पासून गणेश मूर्त्या बनविण्यावर निर्बंध असले तरी नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्त्या बनविण्याकडे मूर्तीकारांचा कल वाढला आहे. एकूण मूर्त्यांच्या जवळपास २५ टक्के मूर्त्या प्लास्टर आॅफ पॅरिसने बनविल्या जात आहेत. यामुळे मातीपासून मूर्त्या बनविणारे कारागीर अडचणीत आले आहेत. नगर परिषदेने या मूर्तीकारांवर कारवाई करणे आवश्यक झाले आहे. प्लास्टर आॅफ पॅरिसने तयार केलेल्या मूर्त्यांचे पाण्यामध्ये विघटन होत नाही. अनेक वर्षापर्यंत या मूर्त्या पाण्यामध्ये जशाच्या तशा राहतात. त्यामुळे ज्या तलावामध्ये या मूर्त्या बुडविल्या जातात. त्या तलावाचे प्रदूषण होण्याचा सर्वाधिक धोका राहतो. त्यामुळे या मूर्त्यांवर राज्य शासनाने प्रतिबंध घातला असून अशा मूर्त्या बनविणाऱ्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी नगर परिषदेवर सोपविण्यात आली आहे. मात्र नगर परिषदेचे कर्मचारी या नियमाकडे कानाडोळा करीत आहेत. मागील तीन वर्षांपासून नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी एकाही मूर्तीकाराच्या घरी जाऊन भेट दिली नाही. त्यामुळे प्लास्टर आॅफ पॅरिसच्या सहाय्याने मूर्त्या बनविण्याकडे येथील कारागीरांचा कल वाढत चालला आहे. मातीपासून बनविलेल्या मूर्तीच्या तुलनेत प्लास्टर आॅफ पॅरिसची मूर्ती कमी श्रमामध्ये, कमी किंमतीत तयार होते. त्याचबरोबर सदर मूर्ती दिसण्यास आकर्षक राहत असल्याने भाविक सदर मूर्ती खरेदी करतो. बहुतांश भाविकांना प्लास्टर आॅफ पॅरिस व मातीपासून तयार करण्यात आलेल्या मूर्तीमधील फरकसुद्धा ओळखत नाही. त्यामुळे मूर्तीकार जी मूर्ती हातात देईल, ती मूर्ती घेऊन गणपतीची प्रतिष्ठापना करतो. गडचिरोली शहरात जवळपास ४० मूर्तीकार आहेत. यातील १० ते १२ मूर्तीकार आपल्या घरी प्लास्टर आॅफ पॅरिसच्या सहाय्याने मूर्त्या बनवित असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. नगर परिषद प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने प्लास्टर आॅफ पॅरिसपासून मूर्ती बनविणाऱ्यांची हिंमत आणखी वाढत चालली आहे. त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची अत्यंत आवश्यकता आहे. अन्यथा पीओपी मूर्त्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. (नगर प्रतिनिधी) अशी ओळखावी पीओपीची मूर्ती ४पीओपी व मातीपासून बनविलेली मूर्ती सर्वसाधारणपणे सारखीच दिसत असल्याने सर्वसामान्य भाविकाला यातील फरक ओळखने कठीण जाते. मात्र मूर्ती खरेदी करतेवेळी भाविकांनी काही गोष्टी लक्षात ठेवाव्या. मातीने बनविलेली गणपतीची मूर्ती पूर्णपणे पोकळ राहते. आतल्या बाजूस माती स्पष्टपणे दिसून येते. त्याचबरोबर या मूर्तीला मागच्या बाजूस छिद्र ठेवलेला असतो. मात्र पीओपीच्या मूर्तीचा फक्त खालचा भाग काही प्रमाणात पोकळ राहतोे. वरचा भाग मात्र पोकळ राहत नाही. त्यामुळे मूर्ती घेताना प्रत्येक भाविकाने मूर्तीचा आतील भाग अवश्य बघावा. पीओपीची मूर्ती लक्षात येऊ नये, यासाठी काही मूर्तीकार खाली पाटी लावून देतात. नेण्यासाठी सोयीस्कर आहे, ही बाब लक्षात घेऊन भाविकसुद्धा अशी मूर्ती खरेदी करून फसतात. पीओपी पाण्यात बुडत नाही. त्यामुळे मूर्ती पाण्यात बुडावी, यासाठी मूर्तीच्या आत माती, गोटे, टाकले जातात. त्यामुळे पीओपीची मूर्ती मातीच्या मूर्तीपेक्षा वजन असल्याचे दिसून येते. पोओपी व मातीच्या मूर्त्यांची केली जाते सरमिसळ ४पीओपीच्या सहाय्याने मूर्ती तयार करणे कायद्यान्वये गुन्हा आहे. ही बाब मूर्तीकरांना चांगल्या पद्धतीने माहित आहे. त्यामुळे एखाद्या वेळेस नगर परिषदेचे कर्मचारी मोहीम उघडल्यास ही बाब लक्षात येऊनही यासाठी काही मातीच्या मूर्त्या ठेवल्या जातात व त्यांच्यामध्येच पीओपीच्याही मूर्त्या ठेवल्या जातात. एखाद्या चोखंदळ भाविकाने चौकशी केल्यास त्याला मातीची मूर्ती दाखविली जाते व आपल्याकडे पीओपीच्या मूर्त्या बनत नाही, असे सांगितले जाते. त्यामुळे नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी शहरातील संपूर्ण मूर्तीकारांच्या घरच्या मूर्त्या तपासणे अत्यंत आवश्यक झाले आहे. अमरावती, यवतमाळच्या मूर्त्या दाखल ४अमरावती, यवतमाळ, वर्धा या जिल्ह्यांमध्ये मूर्तीकारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या जिल्ह्यात पीओपीच्या सहाय्याने तयार करण्यात आलेल्या मूर्त्या गडचिरोली येथील काही मूर्ती व्यापाऱ्यांनी ट्रकने आणल्या आहेत. गणेश चतुर्थीच्या दिवशी मूर्ती खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळते. आपल्याला मूर्ती मिळणार की नाही, अशी भीती भाविकांना असल्याने जी मूर्ती हातात देईल, ती मूर्ती घरी नेली जाते. पीओपीच्या मूर्तींवर कारवाई करण्यासंदर्भात आपल्याकडे परिपत्रक नाही. या मूर्त्यांवर कारवाई करणे ही नगर परिषदेची जबाबदारी नाही. मातीच्या मूर्तीची नोंदणी केल्यानंतर त्याला पीओपीची मूर्ती देण्यात आली तर संबंधित व्यक्तीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करावी, पर्यावरणाची हानी थांबविणे ही नगर परिषदेची जबाबदारी नाही. - कृष्णा निपाने, मुख्याधिकारी, नगर परिषद, गडचिरोली