आजपासून रंगणार अप्पर-डिप्पर क्रिकेट स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:50 IST2021-02-05T08:50:56+5:302021-02-05T08:50:56+5:30

स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्ष योगीता पिपरे यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार राहतील. विशेष अतिथी म्हणून ...

Upper-Dipper cricket tournament to be played from today | आजपासून रंगणार अप्पर-डिप्पर क्रिकेट स्पर्धा

आजपासून रंगणार अप्पर-डिप्पर क्रिकेट स्पर्धा

स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्ष योगीता पिपरे यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार राहतील. विशेष अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य ॲड. राम मेश्राम, पाेलीस निरीक्षक दामदेव मंडलवार तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ.अनंता कुंभारे, डॉ.यशवंत दुर्गे, डॉ.बाळू सहारे, डॉ.प्रशांत चलाख, डॉ. तारकेश्वर उईके उपस्थित राहतील.

पहिल्या दिवशी उद्घाटन सामना, तर दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळी ९ वाजेपासून अप्पर-डिप्पर क्रिकेट प्रीमिअर लीगचे चार सामने खेळविण्यात येतील. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता या स्पर्धेचा समारोपीय कार्यक्रम हाेईल. अध्यक्षस्थानी आमदार डॉ. देवराव होळी राहतील. प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती उपसभापती विलास दशमुखे व इतर मान्यवर राहतील, अशी माहिती संयाेजक अनिल तिडके यांनी दिली.

Web Title: Upper-Dipper cricket tournament to be played from today