शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
2
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
3
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
4
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
5
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
6
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
7
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
8
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
9
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
10
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
11
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
12
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
13
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
14
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
15
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
16
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
17
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
18
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
19
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
20
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून केंद्र शासनाचा निषेध

By admin | Updated: March 2, 2016 01:48 IST

केंद्र शासनाने २९ फेब्रुवारी रोजी मांडलेल्या अर्थसंकल्पात बालकल्याण विभागासाठी मागील वर्षी एवढीच १५ हजार कोटी रूपयांची तरतूद केली आहे.

अर्थसंकल्पात तरतूद केली नाही : केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजीगडचिरोली : केंद्र शासनाने २९ फेब्रुवारी रोजी मांडलेल्या अर्थसंकल्पात बालकल्याण विभागासाठी मागील वर्षी एवढीच १५ हजार कोटी रूपयांची तरतूद केली आहे. त्याचबरोबर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीबाबतचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे जिल्हाभरातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी अंगणवाडी कर्मचारी युनियनचे अध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांच्या नेतृत्वात गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौकात मंगळवारी निषेध मोर्चा काढला. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात प्रचंड नारेबाजी करण्यात आली. या मोर्चाला मार्गदर्शन करताना प्रा. दहिवडे म्हणाले की, महिला व बालकल्याण हा अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे. २०१३-१४ मध्ये या विभागासाठी २७ हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र त्यानंतर या विभागासाठी असलेल्या निधीमध्ये केंद्र शासन दरवर्षी कपात करीत आहे. २०१४-१५ मध्ये १८ हजार कोटी, २०१५-१६ मध्ये १५ हजार कोटी रूपयांची तरतूद केली होती. २०१६-१७ च्या अर्थसंकल्पातही १५ हजार कोटींचीच तरतूद केली आहे. मागील दोन वर्षांपासून केंद्र शासन मानधन वाढीचे आश्वासन देशभरातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना देत आहे. त्यामुळे अर्थसंकल्पात याबाबतची तरतूद केली जाईल, अशी अपेक्षा होती. मात्र याबाबतची तरतूद अर्थसंकल्पात नाही. त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांची निराशा झाली. परिणामी केंद्र शासनाच्या विरोधात देशभरात निषेध मोर्चा काढण्यात येत असल्याचे प्रतिपादन केले. गडचिरोली येथे प्रेस क्लबचे ते इंदिरा गांधी चौकदरम्यान मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्हाभरातील शेकडो अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाल्या होत्या. निषेध मोर्चादरम्यान शासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. (नगर प्रतिनिधी)