शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
4
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
7
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
8
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
9
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
10
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
11
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
12
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
13
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
14
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
15
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
16
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
17
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
18
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
19
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
20
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

आलापल्लीत २४ लाखांचे अनधिकृत बियाणे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:26 IST

आलापल्ली येथील तुकाराम पेरगुवार यांच्या घरी असलेल्या गाेदामात हे प्रतिबंधित बियाणे ठेवले असल्याची गाेपनीय माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली ...

आलापल्ली येथील तुकाराम पेरगुवार यांच्या घरी असलेल्या गाेदामात हे प्रतिबंधित बियाणे ठेवले असल्याची गाेपनीय माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार पाेलीस विभागाच्या मदतीने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली. त्या गाेदामात २ हजार २७० पाकिटे कापूस बियाणे व ३५० किलाे खुले बियाणे आढळून आले. शासकीय दराने त्यांची किंमत २३ लाख ६४ हजार ४७२ रुपये हाेते.

कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या बियाणांचे निरीक्षण केले असता, एकाही पाकिटावर परवाना, लॉट क्रमांक, दिनांक याचा उल्लेख आढळून आला नाही. त्यानुसार तुकाराम पेरगुवार, त्यांचा जावई दामाेदर झाडे व ज्याने बियाणांचा पुरवठा केला त्याच्याविराेधात भादंवि कलम ४२०, महाराष्ट्र कापूस बियाणे कायदा २००९, पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ मधील तरतुदींनुसार तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणातील मूळ आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याचे आव्हान पोलिसांपुढे निर्माण झाले आहे.

ही कारवाई कृषी विभागाच्या तालुका भरारी पथकाचे प्रमुख तालुका कृषी अधिकारी संदेश खरात, कृषी अधिकारी प्रदीप राऊत, कृषी सहायक किरंगे, काेवासे, सहायक पाेलीस निरीक्षक शिंदे, पाेलीस उपनिरीक्षक शेडगे यांच्या पथकाने केली.

(बॉक्स)

चोरट्या मार्गाने होते आयात

जिल्ह्याच्या दक्षिण भागात कापसाचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे दक्षिणेकडील शासनाने प्रतिबंध घातलेल्या जनुकीय सुधारित बियाणांची (एचटीबीटी) अनधिकृतपणे विक्री वाढली आहे. यामुळे शेतजमिनीचा ऱ्हास होत असल्यामुळे हे बियाणे वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. तरीही चोरट्या मार्गाने काही व्यापारी हे बियाणे विक्रीसाठी आणत आहेत.