शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिन्यातच पावसाने खचला बंधारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 05:00 IST

कुरखेडा तालुक्यात सोनसरी, चांदागड, बांधगाव, सावरगाव, येंगलखेडा आदी ठिकाणी एका कंपनीमार्फत बंधारे बांधले जात आहेत. सोनसरी येथे बांधण्यात आलेल्या बंधारा बांधकाम पूर्णत्त्वाचा कालावधी तीन महिने होता. परंतु याकरिता पाच ते सहा महिने लावण्यात आले. बांधकामासाठी काढलेली माती नाल्यामध्येच बंधाऱ्याच्या वरच्या बाजूला ठेवली. त्यामुळे पहिल्याच पावसातील पुराच्या प्रवाहाने एका बाजूने मार्ग काढला.

ठळक मुद्देसोनसरीजवळील काम : निकृष्ट बांधकाम झाल्याचा शेतकऱ्यांचा आरोप; चौकशी करून कारवाई करा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली/कुरखेडा : कुरखेडा तालुक्याच्या सोनसरी गावाजळील नदीवर एका बांधकाम कंपनीकडून कोल्हापुरी बंधाºयाचे बांधकाम हाती घेण्यात आले होते. दोन महिन्यांपूर्वी मे महिन्यात या बंधाऱ्याचे बांधकाम पूर्ण झाले. यावर ८० ते ८५ लाखांचा खर्च झाला. मात्र दोन महिन्यानंतर आलेल्या पहिल्याच पावसातील पुरात बंधारा वाहून गेला. सदर बंधाºयाचे निकृष्ट बांधकाम झाले, असा आरोप करीत बांधकामाची चौकशी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.कुरखेडा तालुक्यात सोनसरी, चांदागड, बांधगाव, सावरगाव, येंगलखेडा आदी ठिकाणी एका कंपनीमार्फत बंधारे बांधले जात आहेत. सोनसरी येथे बांधण्यात आलेल्या बंधारा बांधकाम पूर्णत्त्वाचा कालावधी तीन महिने होता. परंतु याकरिता पाच ते सहा महिने लावण्यात आले. बांधकामासाठी काढलेली माती नाल्यामध्येच बंधाऱ्याच्या वरच्या बाजूला ठेवली. त्यामुळे पहिल्याच पावसातील पुराच्या प्रवाहाने एका बाजूने मार्ग काढला. परिणामी एका शेतकऱ्यांच्या शेताकडील नाल्याचा भाग वाहून गेला. तसेच शेतामध्येही माती पसरली. बंधारा बांधकामावर कोणत्याही शासकीय अभियंत्याची देखरेख नव्हती. सरळ रेषेत बंधारा का बांधला नाही, याबाबत विचारणा केली असता, सेंट्रिंगचे पल्ले जागा सोडल्याचे सांगण्यात आले. जलसंधारण विभाग गडचिरोली कार्यालयाचे दुर्लक्ष असल्याने कंपनीचे अधिकारी मनमर्जीने काम करीत आहेत. गैैरप्रकार झाकण्यासाठी सध्या डागडुजीचे काम येथे सुरू आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी बंधारे बांधले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी शेतकºयांसह माजी जि. प. सदस्य सुरेंद्रसिंह चंदेल यांनी केली आहे.

टॅग्स :RainपाऊसDamधरण