सनशाईन कंपनीच्या दोन संचालकांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 05:00 AM2020-02-04T05:00:00+5:302020-02-04T05:00:36+5:30

रमेशचंद्र गणपतसिंह नायक, रा. छायन, जि. झाबुआ (मध्यप्रदेश) व किसनलाल बसराम मेरावत, रा.राठधनराज, जि.बासवारा (राजस्थान) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना ७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. रमेशचंद्रसह इतर आठ जणांनी सनशाईन हायटेक इन्फ्राकॉम ही कंपनी स्थापन केली.

Two directors of Sunshine Company arrested | सनशाईन कंपनीच्या दोन संचालकांना अटक

सनशाईन कंपनीच्या दोन संचालकांना अटक

Next
ठळक मुद्दे२.२९ कोटींनी फसवणूक : मध्यप्रदेशातून घेतले ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गुंतवणुकीवर दाम दुप्पट रक्कम देण्याच्या नावाखाली ग्राहकांची २ कोटी २९ लाख रूपयांची फसवणूक करणाऱ्या सनशाईन कंपनीच्या दोन संचालकांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १ फेब्रुवारी रोजी अटक केल्याची माहिती पोलीस विभागाकडून सोमवारी सायंकाळी देण्यात आली.
रमेशचंद्र गणपतसिंह नायक, रा. छायन, जि. झाबुआ (मध्यप्रदेश) व किसनलाल बसराम मेरावत, रा.राठधनराज, जि.बासवारा (राजस्थान) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना ७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. रमेशचंद्रसह इतर आठ जणांनी सनशाईन हायटेक इन्फ्राकॉम ही कंपनी स्थापन केली. या कंपनीची शाखा गडचिरोली येथे एप्रिल २०१२ मध्ये उघडली. नागरिकांकडून रक्कम गोळा करण्यासाठी ५१ अभिकर्ते नेमले होते. कमी कालावधीत दुप्पट रक्कम देण्याचे आमिष अभिकर्त्यांमार्फत ठेवीदारांना देण्यात आले. त्यामुळे ठेवीदारांनी कंपनीकडे रक्कम गुंतवली. जिल्ह्यातील २ हजार १३७ ठेवीदारांनी २ कोटी २९ लाख ३ हजार ४९० रुपये सदर कंपनीकडे जमा केले होते. मात्र आॅक्टोबर २०१५ मध्ये या कंपनीने कार्यालय बंद करून ठेवीदारांची रक्कम परत केली नाही. ठेवीदारांच्या तोंडी रिपोर्टवरून कंपनीच्या संचालकांविरूध्द गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेकडे प्रकरण वर्ग करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रामचंद्र नायक व किसनलाल मेरावत दोन आरोपींना अटक केली आहे.
सदर कारवाई पोलीस निरिक्षक उल्हास भुसारी, सहायक पोलीस निरिक्षक विक्रांत सगणे, पोलीस हवालदार नरेश सहारे, भाऊराव बोरकर, सत्यम लोहंबरे, समय्या कासेट्टीवार, माणिक दुधबळे, माणिक निसार आदी उपस्थित होते.

फसवणूक झालेल्यांनी संपर्क करावा
पैसे दामदुप्पट होण्याच्या आमिषाने अनेकांनी सनशाईन कंपनीमध्ये गुंतवणूक केली. पण ज्यांची फसवणूक झाली आहे, अशांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन सहायक पोलीस निरिक्षक विक्रांत सगणे यांनी केले आहे.

 

Web Title: Two directors of Sunshine Company arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Thiefचोर