दोन दुचाकींची समोरासमोर धडक; सहा जण जखमी

By Admin | Updated: August 28, 2016 01:27 IST2016-08-28T01:27:06+5:302016-08-28T01:27:06+5:30

भरधाव वेगाने जाणाऱ्या दोन दुचाकींची समोरासमोर टक्कर झाल्याने सहा जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास भेंडाळा येथे घडली.

Two bikes hit face to face; Six people injured | दोन दुचाकींची समोरासमोर धडक; सहा जण जखमी

दोन दुचाकींची समोरासमोर धडक; सहा जण जखमी

भेंडाळा येथे अपघात : जखमींना गडचिरोली रूग्णालयात हलविले
चामोर्शी : भरधाव वेगाने जाणाऱ्या दोन दुचाकींची समोरासमोर टक्कर झाल्याने सहा जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास भेंडाळा येथे घडली.
शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास मार्र्कंडा येथील राजू शेंडे, उमाजी जुनघरे व फराडा येथील ज्ञानेश्वर हजारे हे मोटारसायकलने भेंडाळाकडून मार्र्कंडादेवकडे जात होते, तर समोरुन तिघे जण एका मोटारसायकलने येत होते. भेंडाळा येथील जुन्या बसथांब्याजवळ दोन्ही मोटारसायकलींची समोरासमोर धडक झाली. या धडकेत मारोती बाबुराव सातपुते (२५) रा. कुरूळ, ज्ञानेश्वर हजारे (२२) रा. फराडा, राजू भगवान शेंडे (३५), उमाजी नानाजी जुनघरे (५०) दोघेही रा. मार्र्कंडादेव हे गंभीर जखमी झाले. तर सुभाष ढेकलू लाटेलवार (२२), आकाश प्रकाश पिपरे (१८) दोघेही रा. कुरूळ हे किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना पंचायत समिती सदस्य प्रमोद भगत यांनी तत्काळ चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात भरती केले. त्यानंतर गंभीर जखमी असलेल्या युवकांना गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. भरधाव वेगामुळे अपघात घडला. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Two bikes hit face to face; Six people injured