शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

वाहनासह सव्वाआठ लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2017 01:39 IST

चामोर्शी येथे अवैधरीत्या दारूचा पुरवठा होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई गडचिरोली : चामोर्शी येथे अवैधरीत्या दारूचा पुरवठा होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने डोंगरगाव-चामोर्शी मार्गावर गस्त लावून बुधवारी पहाटे २.४५ वाजताच्या सुमारास वाहनासह ८ लाख ३२ हजार २४० रूपयांची दारू जप्त केली. डोंगरगाव- चामोर्शी मार्गावर गस्त लावली असताना महिंद्रा पीकअप वाहन येत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला असता, वाहन भरधाव वेगाने चामोर्शी मार्गे पळविण्यात आले. या वाहनाचा पोलिसांनी पाठलाग केला असता, चामोर्शी येथील पेट्रोलपंप आवारात सदर वाहन उभे असल्याचे दिसून आले. पोलिसांनी वाहन क्रमांक एम. एच. ३३ जी. २३८१ ची तपासणी केली असता, २ लाख ८२ हजार २४० रूपये किमतीच्या २ हजार ३५२ सिलबंद निपा आढळून आल्या. तसेच ५ लाख ५० हजार रूपये किमतीचे वाहन जप्त करण्यात आले. सदर माल कोरची येथील पुरवठादार निर्मल धमगाय याचे असल्याचे वाहनचालक श्रवण जमकातन याने सांगितले. सदर कारवाई पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे, इंगळे, बोरकर, दुर्गे, वाळके, नरोटे, चव्हारे, मुंढे, चहारे यांनी केली.