शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

बोगस कर्मचाऱ्यांना बडतर्फ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 06:00 IST

निवेदनात म्हटले आहे की, ज्या बोगस आदिवासी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जात प्रमाणपत्र सादर केले नाही, अशांना ३१ डिसेंबर २०१९ पूर्वी बडतर्फ करावे, अशी मागणी केली आहे. खऱ्या आदिवासी समाजातील उमेदवारांना प्रतिनिधीत्व देऊन रिक्त पदांची भरती करावी, अशी मागणी आहे. यासंदर्भात न्यायालयात शपथपत्र दाखल केलेले आहे. परंतु अजूनही शासनाकडून संबंधिताच्या सेवा समाप्तीबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात आला नाही.

ठळक मुद्देआविसंची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्य सचिवांच्या नावे निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या तसेच जात वैधता प्रमाणपत्र अवैध झालेल्या बोगस अधिकारी व कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात यावे तसेच आदिवासींची राखीव पदे भरण्यात यावी, अशी मागणी आदिवासी विद्यार्थी संघाच्या जिल्हा शाखेने केले आहे.यासंदर्भात राज्याच्या मुख्य सचिवांच्या नावे निवेदन पाठविण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात ६ डिसेंबर रोजी शुक्रवारला निवेदन देण्यात आले. यावेळी आविसचे जिल्हाध्यक्ष क्रांती केरामी, जिल्हा सचिव प्रकाश मट्टामी, सल्लागर संदीप वरखडे, गिरीश जोगे, संदीप मट्टामी, राकेश गावडे, निकेश तिम्मा, राजेश काटेंगे, राहुल हुलामी, राजेश मडावी, टिकेश वाचामी, आतिश आत्राम, साईनाथ कांदो आदी उपस्थित होते.निवेदनात म्हटले आहे की, ज्या बोगस आदिवासी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जात प्रमाणपत्र सादर केले नाही, अशांना ३१ डिसेंबर २०१९ पूर्वी बडतर्फ करावे, अशी मागणी केली आहे. खऱ्या आदिवासी समाजातील उमेदवारांना प्रतिनिधीत्व देऊन रिक्त पदांची भरती करावी, अशी मागणी आहे. यासंदर्भात न्यायालयात शपथपत्र दाखल केलेले आहे. परंतु अजूनही शासनाकडून संबंधिताच्या सेवा समाप्तीबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात आला नाही. बोगस आदिवासींनी राखीव प्रवर्गातून नेमके किती पदे बळकावलेली आहेत, त्याचा निश्चित आकडा शासनाकडे नाही, असे निवेदनात म्हटले आहे.खासगी अनुदानित शाळा, संस्था, विविध महामंडळे, शासकीय उपक्रम राबविणारे कार्यालय, विद्यापीठ, सहकारी संस्था, सेवा मंडळे, महानगर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पंचायत, नगर पालिका, ग्रामपंचायत आदी ठिकाणच्या नोकरभरतीतील अनुसूचित जमातीच्या पदांची तपासणी केल्यास बोगस व खऱ्या आदिवासींचा आकडा हाती येऊ शकते, असे म्हटले आहे.

टॅग्स :Caste certificateजात प्रमाणपत्र