शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
3
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
4
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
5
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
6
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
7
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
8
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
9
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
10
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
11
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
12
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
13
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
14
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
15
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
16
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
17
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
18
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
19
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
20
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
Daily Top 2Weekly Top 5

टसर रेशीम उद्याेग वाढीसाठी प्रयत्न करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:34 IST

आरमाेरी : राज्याचे वस्त्रोद्योग, सार्वजनिक आरोग्य तथा वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आरमोरी येथील टसर रेशीम केंद्रास ...

आरमाेरी : राज्याचे वस्त्रोद्योग, सार्वजनिक आरोग्य तथा वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आरमोरी येथील टसर रेशीम केंद्रास भेट दिली. यावेळी त्यांनी टसर रेशीम केंद्रातील टसर रेशीम निर्मिती प्रक्रिया जाणून घेतली. यावेळी त्यांनी उपस्थित अधिकारी वर्गाला टसर रेशीम उत्पादनाला चालना देऊन ढिवर व आदिवासी वर्गाच्या उदरनिर्वाह व्यवसायाला चालना द्या, अशा सूचना केल्या.

आरमोरी येथील रेशीम केंद्रावर सात एकरांमध्ये कार्यालय परिसरात टसर रेशीम केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. या रेशीम केंद्राच्या अंतर्गत जिल्ह्यातील ४०० हेक्टर वन क्षेत्रामध्ये कमी-अधिक प्रमाणात रेशीमची निर्मिती केली जाते. यावेळी राज्यमंत्री यांनी टसर रेशीमची प्रक्रिया जाणून घेतली व टसर रेशीम कापडाला भरपूर मागणी असल्यामुळे देशाला परकीय चलन मिळवून देणारा हा उद्योग आहे, असे मत व्यक्त केले. टसर कोष उत्पादन तसेच टसर सूत उत्पादन आणि तसेच कापड उत्पादन इत्यादी प्रक्रियेमध्ये रोजगाराची प्रचंड क्षमता आहे त्यामुळे जिल्ह्यातील टसर कोष उत्पादन वाढीवर भर देऊन गडचिरोली जिल्ह्यातील ढिवर तसेच आदिवासी समाजातील जास्तीत जास्त कुटुंबांना याचा फायदा होईल याकडे लक्ष द्यावे अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी टसर रेशीम सूत निर्मिती प्रशिक्षण केंद्र तसेच टसर कोष निर्मिती प्रक्रिया, रेशीम यंत्र पाहणी करून याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी रिलींग बंदा कोष, चलपट कोष, दुदरू कोष यामधील प्रक्रिया प्रत्यक्ष पाहणी करून माहिती जाणून घेतली. या ठिकाणी उपस्थित टसर रेशीम कर्मचारी यांच्याशी संवादही साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी जिल्हा रेशीम विकास अधिकारी बी.व्ही. आव्हाड, अशोक विसपुते, स्वीय सहायक सचिन बडवे, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ उपस्थित होते.

बाॅक्स ..

मदतीचे दिले आश्वासन

टसर लाभार्थीचा मुख्य व्यवसाय मासेमारी असून काही अल्पभूधारक आहे. या व्यवसायाला जोडधंदा म्हणून ते टसर कोष उत्पादनाचा व्यवसाय करतात. त्यामुळे त्यांना मार्गदर्शन करून तसेच रेशीम उत्पादनात वाढ व उद्योग व्यवसाय विस्ताराच्या दृष्टीने उपाययोजना राबवाव्यात यासाठी

शासन आवश्यकतेनुसार आपणाला मदत करेल, असे आश्वासन यावेळी राज्यमंत्री यड्रावकर यांनी प्रशासनाला दिले.