शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींचा कलाविष्कार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 05:00 IST

सदर नृत्य स्पर्धा उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत स्वामी होते. प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल जाधव, पोलीस उपनिरीक्षक धनंजय सेलोकर, अ‍ॅड. खान, रेखा तिपट्टी, भाऊराव जागदाबी हजर होते. आदिवासींच्या कला व संस्कृतीला वाव मिळण्यासाठी सदर रेला नृत्य स्पर्धा घेतली जात आहे.

ठळक मुद्देमहिला-पुरूष व विद्यार्थिनींचा सहभाग : सिरोंचात उपविभागस्तरावर रंगली रेला नृत्य स्पर्धा

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : गडचिरोली पोलीस दल व उपविभ्ज्ञागीय पोलीस अधिकारी कार्यालय सिरोंचाच्या संयुक्त विद्यमाने पोलीस ठाण्याच्या प्रांगणात २० जानेवारी रोजी सोमवारला उपविभागीयस्तरीय आदिवासी रेला नृत्य स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत युवक-युवती, महिला-पुरूष सर्व मिळून एकूण सहा चमूंनी सहभाग घेतला.सदर नृत्य स्पर्धा उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत स्वामी होते. प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल जाधव, पोलीस उपनिरीक्षक धनंजय सेलोकर, अ‍ॅड. खान, रेखा तिपट्टी, भाऊराव जागदाबी हजर होते.आदिवासींच्या कला व संस्कृतीला वाव मिळण्यासाठी सदर रेला नृत्य स्पर्धा घेतली जात आहे. आदिवासींचा कलाविष्कार राष्ट्रीय पातळीवर पोहोचावा, यासाठी ही नृत्य स्पर्धा आहे. आदिवासींची कला व संस्कृती जपून ठेवणे गरजेचे आहे, असे उपविभागीय पोलीस अधिकारी स्वामी म्हणाले.यापूर्वी आदिवासी रेला नृत्य स्पर्धा तालुक्यातील सहा पोलीस ठाण्यांमध्ये घेण्यात आली. या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या चमूला उपविभाग स्तरावरील या स्पर्धेत स्थान देण्यात आले. सिरोंचा येथे आयोजित रेला नृत्य स्पर्धेत पोलीस स्टेशन सिरोंचा, बामणी, आसरअल्ली, रेगुंठा, पातागुडम, झिंगानुर आदी पोलीस ठाण्याच्या प्रत्येकी एक याप्रमाणे सहा चमूंनी सहभाग घेतला. स्पर्धेतील स्पर्धकांनी उत्कृष्ट रेला नृत्य सादर करून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविले.सदर स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. पोलीस दलाच्या पुढाकाराने आदिवासींसाठी या स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठ निर्माण झाले आहे.

टॅग्स :danceनृत्य