शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

जड वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:35 IST

गडचिरोली : शहरात राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे बसस्थानक ते जिल्हा सामान्य रुग्णालयापर्यंत एकतर्फी वाहतूक करण्यात आली ...

गडचिरोली : शहरात राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे बसस्थानक ते जिल्हा सामान्य रुग्णालयापर्यंत एकतर्फी वाहतूक करण्यात आली आहे. मात्र या मार्गावरचे अतिक्रमण हटविले नसल्याने वाहतुकीची कोंडी होण्याचे प्रकार वाढले आहेत. अशातच मोठमोठे ट्रेलर मार्गावरून जात असल्याने वाहतुकीची समस्या गंभीर झाली आहे.

शहरातील मुख्य मार्ग असल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात एसटी, दुचाकी वाहने व मालवाहू वाहनांची गर्दी राहते. एका बाजूचे खोदकाम केले असल्याने एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे. दोन्ही बाजूची वाहने एकाच मार्गाने जात असल्याने सर्वप्रथम या मार्गाच्या बाजूचे अतिक्रमण हटविणे आवश्यक आहे. मात्र नगरपरिषद तसेच बांधकाम विभागाने अतिक्रमण हटविले नाही. अजूनही दुकाने रस्त्यावरच आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. दोन मोठी वाहने समोर आल्यानंतर वाहतुकीची कोंडी होते. नगरपरिषदेने पुढाकार घेऊन अतिक्रमण हटविणे आवश्यक आहे. महामार्गाचे बांधकाम जवळपास एक वर्ष चालणार आहे. तेवढे दिवस शहरातील नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे. त्यामुळे रस्त्यावरचे अतिक्रमण हटविणे अत्यंत गरजेचे झाले आहे.

धानोरा, आरमोरीवरून येणारे ट्रक मूलकडे जाणारे असल्यास त्यांना सेमाना बायपास मार्गे नेण्याचा सल्ला वाहतूक पोलिसांमार्फत दिला जातो. धानोरा मार्गावरही एकतर्फी वाहतूक आहे. विशेष म्हणजे गडचिरोली शहरातून एकही बायपास मार्ग नसल्याने ट्रक शहरातूनच न्यावे लागते. बायपास मार्गाचे बांधकाम झाल्याशिवाय येतील वाहतुकीची समस्या सुटणार नाही.