शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

अर्धवट पूल बांधकामामुळे रहदारी बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:33 IST

सिरोंचा : तालुका मुख्यालयापासून ७० किमी अंतरावर असलेल्या रेगुंठा परिसरातील टेकडा-पर्सेवाडा मार्गावरील पुलाचे काम अर्धवटच असल्याने या मार्गावरील रहदारी ...

सिरोंचा : तालुका मुख्यालयापासून ७० किमी अंतरावर असलेल्या रेगुंठा परिसरातील टेकडा-पर्सेवाडा मार्गावरील पुलाचे काम अर्धवटच असल्याने या मार्गावरील रहदारी बंदच आहे. त्यामुळे नागरिकांना आवागमन करण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रेगुंठा परिसरात ये-जा करण्यासाठी दोन मार्ग आहेत. यामध्ये पहिला मार्ग टेकडा-पर्सेवाडा व दुसरा मार्ग बेज्जूरपल्ली आहे. या दोन्ही मार्गाची अवस्था बिकट झाली आहे. दरवर्षी या मार्गाच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होतो, मात्र कंत्राटदार आपल्या मर्जीने थातूरमातूर काम करून बिल उचलतात, असा आरोप या परिसरातील नागरिकांनी केला आहे.

सिरोंचा तालुका मुख्यालयापासून ७० किमी अंतरावर असलेल्या या परिसरात घनदाट जंगल आहे. परंतु पक्के रस्ते अद्यापही निर्माण झाले नाही. स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतर टेकडा-पर्सेवाडा मार्गाच्या डांबरीकरणास मंजुरी मिळाली. २०१७-१८ मध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत २० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. मंजुरी मिळूनही कामाने मात्र वेग पकडला नाही. मागील तीन वर्षापासून या मार्गावर पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. मात्र कंत्राटदाराने बांधकाम अर्धवट ठेवले आहे. पूर्ण बांधकाम न झाल्याने या मार्गावरील वाहतूक बंद आहे. रेगुंठा परिसरात रेगुंठा, कोटापल्ली, नरसिंहापल्ली, कोत्तूर, येला, मुलादिम्या, मोयाबीनपेठ, बोकाटगुद्दाम, दर्सेवाडा, पर्सेवाडा, चिट्याला आदी १९ गावांचा समावेश आहे. या परिसरातील नागरिकांना तालुका मुख्यालयात ये-जा करण्यासाठी बेज्जूरपल्ली मार्गावरून आवागमन करावे लागते. मात्र बेज्जूरपल्ली मार्गाने तब्बल २५ किमी जास्तीचे अंतर प्रवास करावा लागताे. टेकडा-पर्सेवाडा मार्गावर बांधकाम पूर्ण झाल्यास रेगुंठा परिसरातील लोकांना हा मार्ग सोयीचा होणार आहे. या भागातील लोकप्रतिनिधी तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून पुलाचे बांधकाम पूर्ण करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.