शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
3
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
4
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
5
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
6
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
7
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
8
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
9
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
10
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
11
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
12
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
13
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
14
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
15
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
16
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
17
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
18
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
19
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
20
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सिरोंचा-आसरअल्ली मार्ग खड्ड्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 05:00 IST

पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे रस्त्याची अवस्था जैसे थे होते. संबंधित विभागाकडून थातुरमातूर दुरूस्ती होत असल्यामुळे अल्पावधीतच मार्गाची दुरवस्था होते. सिरोंचा शहरासह राष्ट्रीय महामार्गावरही अशाच प्रकारे डागडुजी केली जाते. परंतु थातुरमातुर काम करणाऱ्यांवर कुठलीही कारवाई होत नाही. सध्या अवजड वाहने दिवस-रात्र ये-जा करीत असतात. खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली आहे.

ठळक मुद्देआवागमनास अडथळा : परिसरातील वाहनधारक त्रस्त; अपघाताची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : सिरोंचा-आसरअल्ली या राष्ट्रीय महामार्गाचे काम काही वर्षांपूर्वी झाले होते. परंतु जड वाहतुकीमुळे या रस्त्याची वाट लागली. सध्या ठिकठिकाणी खड्डे पडून दुरवस्था झाल्याने या मार्गे आवागमन करणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.दरवर्षी पावसाळ्यापूर्वी या मार्गाची दुरूस्ती केली जाते. परंतु पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे रस्त्याची अवस्था जैसे थे होते. संबंधित विभागाकडून थातुरमातूर दुरूस्ती होत असल्यामुळे अल्पावधीतच मार्गाची दुरवस्था होते. सिरोंचा शहरासह राष्ट्रीय महामार्गावरही अशाच प्रकारे डागडुजी केली जाते. परंतु थातुरमातुर काम करणाऱ्यांवर कुठलीही कारवाई होत नाही. सध्या अवजड वाहने दिवस-रात्र ये-जा करीत असतात. खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली आहे.परिसरातील वाहनधारक याच रस्त्याने तालुका मुख्यालयात ये-जा करीत असतात. शिवाय सोमनूर संगमाकडे पर्यटक याच रस्त्याने ये-जा करीत असतात. या मार्गावरील खड्ड्यांमध्ये पडून दुचाकीचे अनेक अपघात घडले आहेत. भविष्यात गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरीसुद्धा संबंधित विभाग रस्त्याच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते.याशिवाय तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची प्रचंड दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात रस्त्यावरील खड्डे विस्तारल्याने सध्या आवागमनास प्रचंड त्रास होत आहे. दररोज घडणाºया किरकोळ अपघातांमुळे आसरअल्ली व पातागुडम परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. खड्डेमुक्त रस्त्याचे आश्वासन शासन देत असले तरी प्रत्यक्ष मात्र काम होत नाही. त्यामुळे रस्त्याची दुरवस्था दीर्घकाळ कायम असते. भविष्यात या मार्गावर गंभीर अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदर मार्गाची दुरूस्ती करून नूतनीकरण करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा