शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून शेतकरी साहित्य संमेलन

By admin | Updated: February 25, 2017 01:22 IST

तिसरे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन २५ व २६ फेब्रुवारी रोजी गडचिरोली येथील

गडचिरोली येथे : पत्रकार परिषदेत माहिती; शेतकऱ्यांच्या समस्यांवर होणार चर्चा गडचिरोली : तिसरे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन २५ व २६ फेब्रुवारी रोजी गडचिरोली येथील सांस्कृतिक सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक प्रा. डॉ. शेषराव मोहिते राहणार असून उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक डॉ. अभय बंग यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती शेतकरी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष गंगाधर मुटे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून आरमोरी येथील सामाजिक कार्यकर्ते शालिक पाटील नाकाडे राहतील. मागील काही वर्षांपासून शेतकरी आत्महत्यांनी विक्राळरूप धारण केले आहे. परंतु प्रसारमाध्यमे वगळता अन्य कोणत्याही आघाडीवर याविषयीचा फारसा उहापोह होत नाही. तसेच उपाययोजना शोधण्यासाठी शर्थीच्या हालचाली होताना दिसत नाही. साहित्य क्षेत्रातील शेतीप्रधान साहित्याची उणीव भरून काढण्यासाठी अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य चळवळ कार्यरत असून या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून २०१५ मध्ये पहिले अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन वर्धा येथे, २०१६ मध्ये दुसरे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नागपूर येथे आयोजित करण्यात आले होते. तिसरे साहित्य संमेलन गडचिरोली येथे आयोजित करण्यात आले आहे. २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता उद्घाटन सोहळा पार पडेल. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. किशोर सानप, कृषी अर्थतज्ज्ञ संजय पानसे, नगराध्यक्ष योगीता पिपरे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ४.३० ते ५.४५ वाजेपर्यंत ‘भारतीय शेतीची पराधिनता’ या विषयावर परिसंवाद, सायंकाळी ६ वाजता स्वामीनाथन आयोग आणि मुक्त अर्थव्यवस्था, रात्री ७ ते ८ वाजेपर्यंत शेतकरीविरोधी कायद्यांचा परिचय, रात्री ८ ते ९ वाजेपर्यंत शेतकरी कवी संमेलन आयोजित केले आहे. रविवारी सकाळी ९ वाजता प्रकट मुलाखत, १०.१५ वाजता पारंपरिक कथा, लोकगीते, ग्रामीण स्त्रीत्वाचे वास्तव दर्शन, दुपारी ११.४५ वाजता शेतकरी आत्महत्यांच्या राज्यात शेतकरी यशोगाथांचे गौडबंगाल, दुपारी १ ते २.३० वाजेपर्यंत शेतकरी कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. दुपारी ३ वाजता समारोप व पुरस्कारांचे वितरण केले जाईल. समारोपीय कार्यक्रमाला शेतकरी नेते अ‍ॅॅड. वामनराव चटप, अनिल घनवट, राजेंद्रसिंह ठाकूर उपस्थित राहणार आहेत. शेती आणि शेतकरी या विषयावर विश्वस्तरीय लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती गंगाधर मुटे यांनी दिली आहे. पत्रकार परिषदेला अशोक गडकरी, ईश्वर मत्ते, सुरेश शेंडे, गणेश मुटे, विनोद काळे उपस्थित होते.