शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
2
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
3
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
4
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
5
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
6
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
7
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
8
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
9
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
10
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
11
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
12
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
13
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
14
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
15
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
16
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
17
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
18
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
19
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

खुनी आरोपीस तीन वर्ष कारावासाची शिक्षा

By admin | Updated: September 24, 2014 23:34 IST

जावयाचा गळा आवळून हत्या करणाऱ्या आरोपीस बुधवार २४ सप्टेंबर रोजी बुधवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन वर्ष कारावास व ५०० रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास सात

गडचिरोली : जावयाचा गळा आवळून हत्या करणाऱ्या आरोपीस बुधवार २४ सप्टेंबर रोजी बुधवारी जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन वर्ष कारावास व ५०० रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास सात दिवस कारवासाची शिक्षाही न्यायालयाने सुनावली आहे.पैकू झिटकू तुलावी, कलिराम अडकू पदा रा. दादापूर अशी शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी व मृतकाचा सासरा अंताराम चुट्टी टेकाम याचे यापूर्वीच निधन झाले आहे. कुरखेडा तालुक्यातील दादापूर येथील देवाजी मडावी (४५) हा दारू पिऊन नेहमी भांडण करायचा. त्यामुळे सासरे अंताराम टेकाम व जावई देवाजी यांच्यात नेहमी वाद होत होते. ७ जुलै २०११ रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास अंताराम टेकाम याने देवाजी मडावी याला काठीने मारहाण केली. त्यानंतर गळा आवळून त्याची हत्या केली होती. या प्रकरणाची तक्रार मृतकाची पत्नी रेणुकाबाई हिने पुराडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीवरून आरोपींविरूद्ध भादंविचे कलम ३०२, ३४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर सदर प्रकरण न्यायप्रविष्ट झाले. आज जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. आर. सिरासाव यांनी आरोपींना शिक्षा सुनावली. सरकारी पक्षांतर्फे अ‍ॅड. सचिन कुंभारे यांनी काम पाहिले.