शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
3
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
4
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
5
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
6
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
7
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
8
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
9
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
10
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
11
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
12
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
13
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
14
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
15
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
16
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
17
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
18
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
19
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
20
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

१४६४ जागांसाठी तीन हजार उमेदवार निवडणूक रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:58 IST

गडचिरोलीसह आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, कोरची आणि धानोरा या सहा तालुक्यांमधील १९९ ग्रामपंचायतींमध्ये पहिल्या टप्प्यात निवडणूक होत आहे. या ग्रामपंचायतींमधील ...

गडचिरोलीसह आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, कोरची आणि धानोरा या सहा तालुक्यांमधील १९९ ग्रामपंचायतींमध्ये पहिल्या टप्प्यात निवडणूक होत आहे. या ग्रामपंचायतींमधील १४६४ जागांसाठी ३२६३ उमेदवारांचे नामांकन वैध ठरले होते. दरम्यान, सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत निवडणूक रिंगणातून माघार घेण्याची मुदत होती. त्यानंतर लगेच निवडणुकीच्या रिंगणात कायम असलेल्या उमेदवारांना चिन्हांचे वाटप करायचे होते. याशिवाय अविरोध निवडल्या जाणाऱ्या उमेदवारांची यादी तयार करायची होती. ही सर्व कसरत करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सहाही तहसील कार्यालयात सुरू होते. ग्रामीण भागातील उमेदवार आणि त्यांचे समर्थक संबंधित तहसील कार्यालयाच्या प्रांगणात निवडणूक चिन्ह कोणते मिळते याची प्रतीक्षा करीत होते. मंगळवारपासून उमेदवारांच्या चिन्हासह प्रचाराला सुरुवात होईल. प्रचारासाठी जेमतेम एक आठवडा मिळणार आहे.

दरम्यान, दुर्गम भागातील काही ग्रामपंचायतींमध्ये एकही नामांकन आले नाही. त्यात धानोरा तालुक्यातील कुलभट्टी आणि कटेझरी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ही गावे नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील भागात आहेत.

अनेक उमेदवारांची अविरोध निवड

सहा तालुक्यातील अनेक गावांमध्ये एका जागेसाठी एकाच उमेदवाराचा अर्ज आला, तर काही ठिकाणी इतर उमेदवारांनी माघार घेतल्याने रिंगणात एकच उमेदवार शिल्लक आहे. अशा सर्व उमेदवारांची अविरोध निवड होणार आहे. त्यांची यादी बनविण्याचे काम संबंधित तहसील कार्यालयात रात्री सुरू होते.

धानोरात १२ तर गडचिरोलीत ३ ग्रामपंचायती अविरोध

गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील अविरोध निवड होणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रत्येकी १५ लाखाचा विकास निधी देण्याची घोषणा आ.डॉ.देवराव होळी यांनी केली होती. त्यानुसार या मतदार संघात धानोरा तालुक्यातील दराची, देवसूर, गिरोला, रेखाटोला, कुथेगाव, कोंदावाही, निमगाव, सावंगा बुज. मोहगाव, चिचोळा, हेटी आणि कामनगड या १२ तर गडचिरोली तालुक्यातील मारदा, हिरापूर आणि मरेगाव या ३ ग्रामपंचायतींमधील सर्व सदस्य अविरोध निवडले जात आहेत.

(बॉक्स)

महिलांवर्ग जोशमध्ये, दारूला आळा

निवडणुकांमध्ये मतदारांना दारूचा पुरवठा करून आपल्याकडे वळविण्याचा उमेदवारांचा कल असतो. पण आता ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत. त्यामुळे उमेदवार महिला आपल्या प्रभागात दारूच्या वाटपाला सहकार्य करणार नाही. गावातील महिला संघटनाही त्याला विरोध करतील. त्यामुळे या निवडणुकीत दारूचा वापर कमीतकमी प्रमाणात होण्याची शक्यता आहे. दरम्यान, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाने हातभट्ट्यांवरील कारवायाही वाढविल्या आहेत.

कोट