भीषण अपघातात तीन ठार, सात जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 14:43 IST2019-04-17T14:41:55+5:302019-04-17T14:43:14+5:30
मेडपल्लीजवळ अपघात : काळी-पिवळी व ट्रकची धडक

भीषण अपघातात तीन ठार, सात जण जखमी
गडचिरोली : दोन भरधाव वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने तीन जण ठार, तर सात जण जखमी झाल्याची घटना बुधवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास आलापल्ली-पेरमिली मार्गावरील मेडपल्ली गावाजवळ घडली.
मृतांमध्ये एक पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे. कोमा बंडू लेकामी (४३), झुरी दस्सा गावडे (७०) व चुक्को करपा आत्राम (७०) सर्व रा. कोळसेपल्ली, अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात मासा पेंटा तलांडी (४५), ढोबी केसा आत्राम (७०), चिना इरपा तलांडी (७०), बाबाजी गोंगले(७०) सर्व रा. कोळसेपल्ली व पोचा जोगी तलांडी(५५) रा.पालेकसा हे जखमी झाले आहेत.
जखमींना अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. पेरमिली पोलीस घटनेचा तपास करीत आहेत. कोळसेपल्ली येथील रहिवासी आलापल्लीला जाण्यासाठी निघाले होते. दरम्यान अपघात घडला.