सव्वा तीन लाखांचा माेहफूल सडवा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:41 IST2021-07-14T04:41:35+5:302021-07-14T04:41:35+5:30

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन पंचांना सोबत घेऊन चांदाळा शेतशिवाराच्या परिसरात अवैध दारू निर्मिती अड्ड्यावर धाड टाकण्यासाठी जात हाेते. ...

Three and a half lakhs worth of flowers were confiscated | सव्वा तीन लाखांचा माेहफूल सडवा जप्त

सव्वा तीन लाखांचा माेहफूल सडवा जप्त

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोन पंचांना सोबत घेऊन चांदाळा शेतशिवाराच्या परिसरात अवैध दारू निर्मिती अड्ड्यावर धाड टाकण्यासाठी जात हाेते. दरम्यान, दारू काढणाऱ्यांना पोलीस येण्याची चाहूल लागताच ते जंगलाचा फायदा घेऊन पसार झाले. पाठलाग केला असता ते मिळून आले नाहीत. विजय दासा बांबोळे व त्याचा साथीदार सुखदेव पशू पांचोळे दोन्ही रा. चांदाळा अशी पळून जाणाऱ्यांची नावे आहेत. घटनास्थळावर ३२ प्लास्टिक ड्रम आढळले. त्यात दारू गाळण्याकरिता टाकलेला ३२०० किलो मोहाचा सडवा आढळून आला. याची किमत ३ लाख २० हजार रूपये एवढी आहे. ३० हजार रूपये किमतीची माेहफुलाची दारू, ३२ प्लास्टिक ड्रम, व चार माेठ्या जर्मनच्या केटल्या आढळून आल्या. असा एकूण ३ लाख ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींविराेधात पोलीस स्टेशन गडचिरोली येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Web Title: Three and a half lakhs worth of flowers were confiscated