शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

-तर सात मीटरच रस्ता उरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 05:00 IST

देसाईगंज येथील विर्शी तुकूम सर्वे नं. १७८/४ च्या लेआऊटमध्ये नियोजन प्राधिकरण नगरविकास विभाग यांच्या वतीने १६ आॅक्टोबर २००१ रोजी नऊ मीटरचा रस्ता जिल्हाधिकारी कार्यालयाने मंजूर केला. परंतु या रस्त्याच्या दुतर्फा लगतच्या रहिवाशांनी घर बांधकाम करताना रस्त्यावरील जागेवर पक्के बांधकाम करून अतिक्रमण केले. रस्त्याची नियोजित जागा अनधिकृतरित्या कब्जात घेतली.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार : कस्तुरबा वॉर्डातील अतिक्रमण हटविण्याकडे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : शहराच्या कस्तुरबा वॉर्डातील सिद्धांत नगरात नालीचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम करताना अतिक्रमण हटवून रस्त्यासाठी नऊ मीटर जागा सोडणे आवश्यक होते. परंतु याकडे दुर्लक्ष करून सिमेंट काँक्रिट नालीचे बांधकाम प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आले. रस्त्यासाठी आता केवळ सात मीटरच जागा उरत आहे. त्यामुळे येथून आवागमन करणाऱ्या लोकांसाठी अडचणीचे ठरणार आहे. ही बाब लक्षात घेऊन नागरिकांनी स्थानिक प्रशासनासह जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.देसाईगंज येथील विर्शी तुकूम सर्वे नं. १७८/४ च्या लेआऊटमध्ये नियोजन प्राधिकरण नगरविकास विभाग यांच्या वतीने १६ आॅक्टोबर २००१ रोजी नऊ मीटरचा रस्ता जिल्हाधिकारी कार्यालयाने मंजूर केला. परंतु या रस्त्याच्या दुतर्फा लगतच्या रहिवाशांनी घर बांधकाम करताना रस्त्यावरील जागेवर पक्के बांधकाम करून अतिक्रमण केले. रस्त्याची नियोजित जागा अनधिकृतरित्या कब्जात घेतली. तरीसुद्धा काहीच कारवाई झाली नाही. सध्या नगर परिषदेच्या वतीने रस्त्याच्या बाजूने नाली बांधकामाचे काम सुरू आहे. नाली बांधकाम करताना नऊ मीटरच्या रस्त्यावर असलेले अनधिकृत अतिक्रमण हटविण्यासंदर्भात तक्रार मुख्याधिकाऱ्यांना दोनवेळा देण्यात आली. परंतु प्रशासनाने रस्त्यावरील व ले-आऊटमधील कोणतेही अतिक्रमण हटविले नाही. उपलब्ध सात मीटर रस्त्याच्या बाजूने नाली बांधकाम करण्याचे प्रस्तावित केले आहे. त्यामुळे या मार्गावर नऊ ऐवजी सात मीटरचाच रस्ता उरणार आहे. सार्वजनिक रहदारीच्या दृष्टीने येथील अतिक्रमण हटवून नऊ मीटरचा रस्ता उपलब्ध करावा, अशी मागणी एम. आर. बोटकावार, ए. जी. रामटेके, एम. एच. तिरपुडे, के. पी. सहारे, बी. टी. ढोमणे, आर. एन. गभणे, एच. एस. लाडे, डी. लोनबले यांनी तक्रारीद्वारे केली.पांदण रस्ता म्हणून नोंद२००१ मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नगरविकास विभागाने कस्तुरबा वॉर्डातील हा रस्ता शेतीकडे जाणारा पांदण रस्ता म्हणून प्रस्तावित केले होते. परंतु कालांतराने या भागात लोकवस्ती वाढली. अनेक ले-आऊटधारकांनी अतिक्रमण केल्याने नऊ मीटरचा रस्ता केवळ सात मीटर रूंद उरला आहे. परंतु याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने ले-आऊटधारकांचे फावले व रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमणही फोफावले.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणcollectorजिल्हाधिकारी