शिक्षकांचे अन्नत्याग आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 05:00 AM2020-06-05T05:00:00+5:302020-06-05T05:00:43+5:30

टीईटी ग्रस्त शिक्षकांचे जानेवारी २०२० पासूनचे रोखलेले वेतन न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून अदा करणे, अपंग समावेशित शिक्षण योजना (माध्यमिक स्तर) अंतर्गत नियुक्त विशेष शिक्षक व परिचारिकांना उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार थकीत व नियमित वेतन अदा करणे तसेच अन्यत्र समायोजन करणे. ८ हजार संगणक शिक्षक-निदेशकांना सेवेत पूर्ववत रुजू करणे, रात्रशाळेला पूर्णवेळ शाळेचा दर्जा देणे आदी मागण्यांचा समावेश होता.

Teachers' hunger strike | शिक्षकांचे अन्नत्याग आंदोलन

शिक्षकांचे अन्नत्याग आंदोलन

Next
ठळक मुद्देशिक्षक परिषदेचे निवेदन : वेतनविषयक समस्या निकाली काढण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अनुदानास पात्र-घोषित प्राथमिक, माध्यमिक, व उच्च माध्यमिक शाळातील शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या वेतनविषयक व अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने गुरूवार ४ जून रोजी एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन केले. आंदोलनानंतर शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्यामार्फत राज्य शासनाला निवेदन पाठविण्यात आले.
निवेदनात, अनुदानास पात्र-घोषित प्राथमिक, माध्यमिक, व उच्च माध्यमिक शाळा व वर्ग तुकड्यावरील शिक्षक व कर्मचाऱ्यांना १ एप्रिल २०१९ पासून २० टक्के वाढीव अनुदान देणे, अघोषित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व नैसर्गिक वाढीच्या वर्गतुकड्यांचे प्रलंबित प्रस्ताव निकाली काढून अनुदानास पात्र घाषित करणे व वेतन अनुदान वितरित करणे, उच्च माध्यमिक शाळांतील २००३ ते २०१९ या कालावधीतील प्रस्तावित नैसर्गिक वाढीच्या पदांना शासन मान्यता प्रदान करून वेतन अनुदान वितरित करणे, टीईटी ग्रस्त शिक्षकांचे जानेवारी २०२० पासूनचे रोखलेले वेतन न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून अदा करणे, अपंग समावेशित शिक्षण योजना (माध्यमिक स्तर) अंतर्गत नियुक्त विशेष शिक्षक व परिचारिकांना उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार थकीत व नियमित वेतन अदा करणे तसेच अन्यत्र समायोजन करणे. ८ हजार संगणक शिक्षक-निदेशकांना सेवेत पूर्ववत रुजू करणे, रात्रशाळेला पूर्णवेळ शाळेचा दर्जा देणे आदी मागण्यांचा समावेश होता. राज्यभरातील आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी शिक्षक परिषदेच्या पदाधिकाºयांनी गुरूवारी एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन करून शासनाला निवेदन पाठविले.
प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची मागणी जिल्हाध्यक्ष संतोष सुरावार, कार्यवाह गोपाल मुनघाटे, संतोष जोशी, उपाध्यक्ष मनोज बोमनवार, केवळराम किरणापुरे, श्यामराव सोनुले, जी. एच. रहेजा, देविदास नाकाडे, नरेंद्र जक्कुलवार, शिवदास वाढणकर, मृणाल तुम्पल्लीवार, गणेश तगरे, चंद्रकांत बुरांडे, श्यामराव बंडावार, अशोक इंदुरकर, कल्पना खेडुलकर, पंढरी पोफरे, रवीश गुडेल्लीवार व पदाधिकाºयांनी केली आहे.

Web Title: Teachers' hunger strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Teacherशिक्षक