शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
2
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
3
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
4
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
5
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
6
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
7
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
8
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
9
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
10
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
11
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
12
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
13
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
14
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
15
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
16
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
17
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
18
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
19
आशिष नेहरा वर्षाला किती कमवतो? GT चा कोच म्हणून किती मानधन घेतो? आकडा वाचून थक्क व्हाल
20
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांची जिल्हा कचेरीवर धडक

By admin | Updated: July 16, 2015 02:06 IST

जिल्ह्यातील उच्च माध्यमिक व्यावसायिक अभ्यासक्रमातील शिक्षकांनी मंगळवारी विविध न्याय मागण्यांसदर्भात जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : व्यावसायिक अभ्यासक्रम व शिक्षकांच्या समस्या सोडवा
गडचिरोली : जिल्ह्यातील उच्च माध्यमिक व्यावसायिक अभ्यासक्रमातील शिक्षकांनी मंगळवारी विविध न्याय मागण्यांसदर्भात जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन मागण्यांचे निवेदन सादर केले.
यावेळी निवासी जिल्हाधिकारी सुनील गाढे यांनी शिष्टमंडळासोबत चर्चा करून निवेदन स्वीकारले. महाराष्ट्र व्होकेशन टिचर्स असोसिएशनच्यावतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शैक्षणिक सत्र २०१५-१६ पासून राज्यात पुनर्रचित उच्च माध्यमिक व्यावसायिक अभ्यासक्रमांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. मात्र शासनाची तयारी केवळ कागदोपत्री झालेली आहे. पुनर्रचित अभ्यासक्रमाचे संघटना स्वागत करीत आहे. परंतु हा अभ्याक्रम लागू करीत असताना विद्यार्थीहिताचा शासनाने प्राधान्याने विचार करावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.
उच्च माध्यमिक या शैक्षणिक अर्हतेचा समावेश शासकीय, निमशासकीय आणि खासगी संस्थातील विविध पदांच्या सेवा नियमावलीत करावा, नवीन अभ्यासक्रमांचा समावेश शिकाऊ उमेदवारी योजनेमध्ये करावा, याच अभ्यासक्रमात पदवी व पदव्युत्तर शिक्षणाची दालने उघडणाऱ्या व्यवसाय विद्यापीठाची स्थापना करावी, आदी मागण्या मान्य झाल्यानंतरच शासनाने पुनर्रचित अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करावी. शासन निर्णयानुसार रोजगार, स्वयंरोजगार व कौशल्य विकास आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली उच्च माध्यमिक अभ्याक्रम तसेच द्विलक्षी अभ्यासक्रम या योजनांच्या आढाव्याकरिता कार्यकारी समिती गठित करण्यात आली आहे.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली देखील उच्चस्तरीय समिती गठित करण्यात आलेली आहे. मात्र या दोन्ही समित्यांचे कार्य पूर्ण झालले नाही. या समित्यांकडून कुठल्याही शिफारशी व सूचना प्राप्त होण्याआधीच घिसडघाईने पुनर्रचित अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करणे योग्य होणार नाही. विद्यार्थी, शिक्षक व संस्थाचालकांच्या अडचणी दूर झाल्याशिवाय पुनर्रचित अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करू नये, अशी मागणी महाराष्ट्र व्होकेशनल टिचर्स असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी व जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकाऱ्यांमार्फत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाच्या संचालकाकडे करण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रा. युगल रायलु, प्रा. संदीप रेवतकर, प्रा. प्रशांत तम्मेवार, प्रा. ए. एम. धामोडे, प्रा. आर. के. बारसागडे, प्रा. हिरादेवे, प्रा. राठोड, प्रा. भिवगडे, प्रा. मिसार, प्रा. रणदिवे, प्रा. गोबाडे, प्रा. नागुलवार, प्रा. एस. वाय. मेश्राम, प्रा. डी. जी. मेश्राम, प्रा. पुंडे, प्रा. निमजे, प्रा. जयंत हटवार, प्रा. बारसागडे, प्रा. मालेवार, गलबले आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)