प्रभावी अंमलबजावणी न करणाऱ्यांवर कारवाई करणार

By Admin | Updated: August 25, 2016 01:11 IST2016-08-25T01:11:12+5:302016-08-25T01:11:12+5:30

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सर्व शाळांनी करावी, या उपक्रमाच्या अंमलबजावणी कुचराई

Take action against those who do not implement effective implementation | प्रभावी अंमलबजावणी न करणाऱ्यांवर कारवाई करणार

प्रभावी अंमलबजावणी न करणाऱ्यांवर कारवाई करणार

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम : शंतनू गोयल यांचा इशारा
गडचिरोली : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी सर्व शाळांनी करावी, या उपक्रमाच्या अंमलबजावणी कुचराई करणाऱ्यांच्या विरोधात प्रशासकीय कारवाई करणार, असा इशारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल यांनी दिला.
येथील जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेत गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांची आढावा सभा घेण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी सभेला शिक्षणाधिकारी (प्राथमिक) माणिक साखरे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) नानाजी आत्राम, डायटचे प्राचार्य प्रा. रमतकर, अधीव्याख्याता चापले, डॉ. मत्ते, प्रा. वैद्य आदी उपस्थित होते.
याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल यांनी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रम व अप्रगत विद्यार्थ्यांसाठी विशेष उपाययोजना, सरलमधील विद्यार्थ्यांची नोंद आदी बाबींचा आढावा घेतला. यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले, पायाभूत चाचणी सन २०१५-१६ व पायाभूत चाचणी सन २०१६-१७ चा वर्गनिहाय तुलनात्मक तक्ता प्रत्येक शाळेमध्ये ठेवण्यात यावा, वर्गनिहाय व शाळानिहाय पायाभूत चाचणी श्रेणी अहवाल तत्काळ सादर करावा, इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची सर्व जि. प. शाळांनी २५ आॅगस्टच्या आत व खासगी शाळांनी २७ आॅगस्टच्या आत सरलमध्ये नोंद करणे आवश्यक आहे, अशा सूचना त्यांनी केल्या. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Take action against those who do not implement effective implementation