शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
2
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
3
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
4
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
5
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
6
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
7
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
8
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
9
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
10
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
11
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
12
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
13
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
14
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
15
PCOS नाही, आता PMOS! ८ पैकी १ ‘या’ समस्येने त्रस्त; १७ कोटी महिलांच्या आरोग्यावर थेट परिणाम
16
नाशिक-पुणे, सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी बड्या तरतुदी मान्य; राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय
17
मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!
18
Travel : अवघ्या २५ हजारांत करा 'भारताच्या स्कॉटलँड'ची ट्रिप! बजेट प्लॅनिंगसाठी फॉलो करा 'या' खास टिप्स
19
Video - मुलींना बेदम मारलं, मुलाला उलटं टांगलं; शिक्षक झाला हैवान, शाळेतील धक्कादायक प्रकार
20
Instagram अकाउंट अचानक बॅन झालंय? घाबरू नका! 'या' सोप्या ट्रिकने मिनिटांत होईल रिकव्हर
Daily Top 2Weekly Top 5

मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करा

By admin | Updated: July 8, 2015 02:02 IST

धानोरा तालुक्यातील मिचगाव (खुर्द) येथील श्रीराम फटींग, बंटी फटींग, गोलू फटींग, किरण फटींग, मंगला फटींग ...

कडुकर कुटुंबीयांची मागणी : तक्रार घेण्यास पोलिसांचा नकार
गडचिरोली : धानोरा तालुक्यातील मिचगाव (खुर्द) येथील श्रीराम फटींग, बंटी फटींग, गोलू फटींग, किरण फटींग, मंगला फटींग व अनंता फटींग या सहा जणांनी वाद घालून विलास पांडुरंग कडुकर, पंकज विलास कडुकर, गणेश विलास कडुकर व पल्लवी भाऊराव कडुकर या चौघांना बेदम मारहाण केली. हे चारहीजण जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत आहेत. या घटनेसंदर्भात तक्रार देण्यासाठी गेलो असता, गडचिरोली व चातगाव पोलिसांनी तक्रार स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून कडुकर कुटुंबीयांना मारहाण करणाऱ्या फटींग कुटुंबीयातील सहा जणांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रेमलाल पांडुरंग कडुकर व सुधाकर पांडुरंग कडुकर यांनी मंगळवारी गडचिरोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.
यावेळी माहिती देताना प्रेमलाल कडुकर म्हणाले, विलास कडुकर व श्रीराम फटींग यांचे घर शेजारी आहे. दोन्ही घराच्या मदात रस्ता आहे. श्रीराम फटींग हे आपल्या शेळ्या कडुकर यांच्या घरालगत असलेल्या संरक्षण कुंपालगत रिकाम्या जागेत नेहमी बांधत असतात. घटनेच्या दिवशी ५ जुलैला रविवारी सायंकाळी ५.३० ते ६ वाजताच्या सुमारास शेळी हाकलल्याच्या कारणावरून फटींग कुटुंबीयांनी कडुकर कुटुंबीयांशी वाद घातला. दरम्यान कडुकर कुटुंबीयातील चौघांना बेदम मारहाण करून जखमी केले. त्यानंतर कडुकर यांचे नातेवाईक आनंदराव कावळे यांना भ्रमणध्वनीवरून माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सर्व जखमींना गडचिरोलीच्या रुग्णालयात दाखल केले.
रुग्णालय पोलीस चौकीतील एका पोलीस शिपायाने सर्व जखमींचे बयाण घेतले व त्याने गडचिरोली शहर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार देण्यास आम्हाला सांगितले. त्यानुसार आम्ही चार ते पाच नातेवाईक मिळून रात्री १०.३० वाजताच्या सुमारास गडचिरोली पोलीस ठाण्यात गेलो. यावेळी तेथील पोलीस उपनिरीक्षक गांगुर्डे यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी चातगाव पोलीस मदत केंद्रात तक्रार देण्यास सांगितले. मात्र चातगाव पोलिसांनी आमची तक्रार घेतली नाही, असा आरोपही प्रेमलाल कडुकर यांनी केला. (स्थानिक प्रतिनिधी)