वनश्री महाविद्यालयात दारू-तंबाखू खर्च प्रमाणाचे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:36 IST2021-01-13T05:36:09+5:302021-01-13T05:36:09+5:30

कोरची : शोधग्राम चातगावच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या तंबाखू, दारू सेवन व खर्चाबाबत तालुक्यातील कोरची, नवरगाव, बेडगाव, सोहले, बोटेकसा, बेतकाटी, ...

Survey of Alcohol-Tobacco Expenditure Quantity in Vanashree College | वनश्री महाविद्यालयात दारू-तंबाखू खर्च प्रमाणाचे सर्वेक्षण

वनश्री महाविद्यालयात दारू-तंबाखू खर्च प्रमाणाचे सर्वेक्षण

कोरची : शोधग्राम चातगावच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या तंबाखू, दारू सेवन व खर्चाबाबत तालुक्यातील कोरची, नवरगाव, बेडगाव, सोहले, बोटेकसा, बेतकाटी, कोहका, आंबेखारी व ग्यारापती अशा एकूण नऊ गावांत सर्वेक्षण करण्यात आले. वनश्री कला व विज्ञान महाविद्यालयातील रासेयो स्वयंसेवकांनी हे सर्वेक्षण केले. यासाठी ७ जानेवारीला वनश्री महाविद्यालयात रासेयो स्वयंसेवकांना दारू व तंबाखू खर्च प्रमाण सर्वेक्षण करण्याबाबत सर्च कार्यकर्ता किशोर खोब्रागडे, महेश उरकुडे व शिवाजी थुटे यांनी प्रशिक्षण दिले. ८ जानेवारीला एका गावात दोन रासेयो स्वयंसेवकांनी जाऊन सर्व्हे केला. या उपक्रमात दीपक नरडंगे, राजेश मडावी, अजीत कोचे, प्रदीप नैताम, संगीता हलामी, विनीश आडूलवार, माेनिका हलामी, कार्तिक नैताम, अविनाश राऊत, रूपेश फुलकवर, रशिका टेकाम व प्रियंका कड्यामी आदी सहभागी झाले.

Web Title: Survey of Alcohol-Tobacco Expenditure Quantity in Vanashree College