मतदान केंद्रावर आधार नोंदणी

By Admin | Updated: May 2, 2015 01:34 IST2015-05-02T01:34:49+5:302015-05-02T01:34:49+5:30

मतदाराकडे असलेल्या आधारकार्ड क्रमांकाची लिंक मतदान कार्डसोबत करण्याच्या उद्देशाने नोंदणी करण्यासाठी ग्राम पंचायत

Support registration on polling station | मतदान केंद्रावर आधार नोंदणी

मतदान केंद्रावर आधार नोंदणी

गडचिरोली : मतदाराकडे असलेल्या आधारकार्ड क्रमांकाची लिंक मतदान कार्डसोबत करण्याच्या उद्देशाने नोंदणी करण्यासाठी ग्राम पंचायत निवडणुकीदरम्यान प्रत्येक मतदान केंद्रावर स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. यादरम्यान जिल्हाभरातील हजारो नागरिकांच्या आधारकार्ड क्रमांकाची व संपर्क क्रमांकाची नोंदणी करण्यात आली.
निवडणुकीच्या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याच्या उद्देशाने प्रत्येक मतदान कार्ड आधारकार्डाच्या क्रमांकासोबत लिंक करण्याचे काम निवडणूक विभागाने हाती घेतले आहे. गडचिरोली जिल्ह्यात ग्राम पंचायतीची निवडणूक पार पडली. मतदान करण्यासाठी प्रत्येक मतदार आपला मतदान कार्ड घेऊन मतदान केंद्रावर येणार ही बाब लक्षात घेऊन जिल्हा निवडणूक विभागाने आधारकार्ड व संपर्क क्रमांकाच्या नोंदणीसाठी स्वतंत्र कर्मचारी नेमला. या कर्मचाऱ्यांनी प्रत्येक मतदाराचा आधारकार्ड क्रमांक व संपर्क क्रमांक नोंदवून घेतला. या मोहिमेमुळे एकाच दिवशी हजारो आधारकार्डाची नोंदणी झाली. यामुळे निवडणूक विभागाचे बरेचसे काम हलके झाले आहे. आधारकार्ड मतदान कार्डासोबत लिंक झाल्याने ज्या मतदारांचा नाव दोन जिल्ह्यामध्ये आहे. अशा मतदारांचे नाव कोणत्याही एका जिल्ह्यातून कपात करण्यास आधारकार्डमुळे मदत होणार आहे.

Web Title: Support registration on polling station