शहरं
Join us  
Trending Stories
1
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
2
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
3
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
4
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
5
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
6
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
7
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
8
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
9
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
10
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
11
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
12
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
13
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
14
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
15
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
16
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
17
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
18
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
19
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
20
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी दिले धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2016 02:04 IST

येथील पोलीस स्टेशनमधील पोलीस उपनिरीक्षक मल्हार थोरात यांची बदली रद्द करण्यात यावी

चामोर्शी : येथील पोलीस स्टेशनमधील पोलीस उपनिरीक्षक मल्हार थोरात यांची बदली रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी शनिवारी सकाळी १० वाजता नगर पंचायत उपाध्यक्ष राहूल नैताम यांच्या नेतृत्वात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची शहरातून रॅली काढून पीएसआयच्या समर्थनार्थ निदर्शने करण्यात आली.
पोलीस उपनिरीक्षक मल्हार थोरात हे दोन महिन्यांपूर्वी चामोर्शी पोलीस स्टेशनमध्ये रूजू झाले. त्यांनी अवैध धंद्यांविरोधात मोहीम उघडली होती. त्यामुळे अवैध व्यावसायिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. अनेकांनी अवैध धंदे सोडूनही दिले होते. थोरात यांच्यावरील वचपा काढण्यासाठी त्यांना एका खोट्या प्रकरणात अडकवून त्यांची इतरत्र बदली करण्यात आली आहे. सदर बदली रद्द करण्यात यावी, या मागणीसाठी ‘पीएसआय थोरात बचाव रॅली’ विद्यार्थ्यांमार्फत शहरात काढण्यात आली. सदर रॅली संपूर्ण चामोर्शी शहरातून फिरविण्यात आली. चर्चेदरम्यान आमदार डॉ. देवराव होळी यांनी थोरात यांची बदली रद्द केली जाईल, असे आश्वासन दिले.
रॅलीचे नेतृत्व नगर पंचायत उपाध्यक्ष राहूल नैताम, भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, नगरसेवक प्रशांत येगलोपवार, जयराम चलाख, रनसोड कलंत्री, अनिल भैसारे, भोजराज भगत, रतन आभारे, कैसीक बिश्वास, बंडू साखरे यांनी केले. स्वाभीमानी सामाजिक संघटना पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, खा. अशोक नेते यांना सुध्दा निवेदन पाठविले आहे. निवेदन देतेवेळी संघटनेचे अध्यक्ष अवदूत चलाख, प्रकाश सहारे, क्रिष्णा नैताम, दिवाकर कोहळे, संतोष बुरांडे, राजू धोडरे, विलास नैताम, हनुमंत डंबारे, पुरूषोत्तम उंदीरवाडे उपस्थित होते.
यापूर्वी चामोर्शी येथील काही नागरिकांच्या वतीने आ. डॉ. देवराव होळी यांना निवेदन सादर करून पीएसआय थोरात यांची बदली रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर आता विद्यार्थ्यांनी धरणे दिले. (शहर प्रतिनिधी)