निमनवाडा परिसरातील वीज पुरवठा सुरळीत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:40 IST2021-08-19T04:40:36+5:302021-08-19T04:40:36+5:30

निमगाव बोरी, मासरगाटा या तीन गावांतील वीज पुरवठा मागील तीन महिन्यांपासून रात्रं-दिवस अनेकदा खंडित होत असतो. याबाबत अनेकदा संबंधित ...

Strengthen power supply in Nimanwada area | निमनवाडा परिसरातील वीज पुरवठा सुरळीत करा

निमनवाडा परिसरातील वीज पुरवठा सुरळीत करा

निमगाव बोरी, मासरगाटा या तीन गावांतील वीज पुरवठा मागील तीन महिन्यांपासून रात्रं-दिवस अनेकदा खंडित होत असतो. याबाबत अनेकदा संबंधित लाईनमन व अभियंता यांच्याकडे तोंडी सूचना देण्यात आली. परंतु वीज पुरवठा सुरळीत केला नाही. सध्या पावसाचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे डासांची पैदास वाढली आहे. तसेच दमट वातावरणामुळे उकाडा वाढला आहे व शेतीचा हंगाम सुरू असून शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. तरी परिसरातील वीज पुरवठा सुरळीत करून द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

निवेदन देताना शिवसेना तालुका अध्यक्ष शेखर उईके, उपसरपंच चेतन सुख्खाग, तुळशीदास कुकुडकर, आनंदराव वरखडे, लालाजी नगराळे, भगवान खोब्रागडे, महेश मडावी, मुकेश बोडगेवार, वीरेन्द्र गावतुरे, नकुल बोरीकर, जितेश गुरनूले, सुनील दरों आदी उपस्थित होते.

180821\img-20210818-wa0037.jpg

निमनवादा येथील ग्रामस्थ निवेदन देताना

Web Title: Strengthen power supply in Nimanwada area