शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यस्थीच्या आडून ‘वसुली’ करण्याचा पाकचा मोठा डाव; पूर्वीही दोनदा असेच खिसे भरून घेतलेत!
2
Latest Marathi News LIVE Updates: पनवेल रेल्वे स्थानकात लिफ्ट कोसळली, ४ प्रवासी असल्याची माहिती
3
अतिवृष्टीचा इशारा; पिके चांगली पण रोगराई, नासाडीची भीती; भेंडवळ घटमांडणीचे यंदाचे भाकीत
4
सोन्याचे दर ₹१,५०० हून अधिकने कोसळले; तर चांदीही ₹५,००० ने स्वस्त; पुढे काय..?
5
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
6
शेअर मार्केटचे जोरदार सुरुवात; सेन्सेक्स १६० अंकांनी वधारला, तर निफ्टी २४,४१० पार...
7
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
8
Mumbai Local Train Update: डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
9
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
10
३ दिवस गजकेसरी राजयोग २०२६: ७ राशींना शुभ-लाभ, वरदान काळ; पद-पैसा वाढ, सुख-सुबत्ता!
11
कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज विक्रेत्यांना एन्ट्री देणारा सुरक्षा रक्षक अटकेत; आरोपींची संख्या १० वर!
12
Tarot Card: संयम ठेवा, आठवड्याच्या शेवटी सगळं छानच होईल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
13
“KDMCतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी, पाणी प्रश्न सुटण्यासाठी प्रकल्पांना गती देणार”: DCM शिंदे
14
आधी मुलाचं अपहरण, मग जबरदस्तीने मुलींचे कपडे घालून वेश्या व्यवसायात ढकललं
15
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
16
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
17
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
18
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
19
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
20
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
Daily Top 2Weekly Top 5

एटापल्लीला वादळाचा तडाखा

By admin | Updated: May 7, 2016 00:12 IST

गेल्या पाच दिवसांपासून तालुक्यात सायंकाळी व रात्रीच्या सुमारास झालेल्या जोरदार वादळामुळे अनेक घरांचे कवेलु फुटले आहेत.

टिनपत्रे उडाले, कवेलू फुटले : २२ घरांची पडझड; लाखो रूपयांचे नुकसानएटापल्ली : गेल्या पाच दिवसांपासून तालुक्यात सायंकाळी व रात्रीच्या सुमारास झालेल्या जोरदार वादळामुळे अनेक घरांचे कवेलु फुटले आहेत. तसेच काही घरांचे टिनपत्रे उडाले आहे. जनावरांच्या गोठ्यावरील छतही कोसळले. बुधवारी रात्री कसनसूर परिसरात आलेल्या वादळामुळे कसनसूर, जारावंडी या मुख्य मार्गावर मोठे झाड पडल्याने सदर मार्ग बंद झाला आहे. वादळाचा एटापल्ली तालुक्याच्या ग्रामीण भागाला जोरदार तडाखा बसल्याने नागरिकांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.५ मे रोजी गुरूवारला रात्री आलेल्या वादळामुळे एटापल्ली शहरातील आनंद नगर येथील राजू कोलुरवार यांचे आटाचक्की व किराणा दुकानाच्या इमारतीवरील छत उडाले. तसेच याच वार्डातील प्रमोद देवतळे यांच्या घरावरील छत उडाले. एटापल्ली-आलापल्ली या मुख्य मार्गावर असलेल्या पुरूषोत्तम गादेवार यांच्या राईसमील गोदाम इमारतीवरील छत उडाले. वादळामुळे एटापल्ली तालुक्यातील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जारावंडी मंडळ अधिकारी कार्यालयांतर्गत वडसा खुर्द गावातील पाच घरे, दिंडवी येथील सात व जारावंडी येथे दहा घरांचे छत उडाले. एकूण २२ घरांचे नुकसान झाल्याची तक्रार तहसील कार्यालयाला प्राप्त झाली असल्याची माहिती तहसीलदार संपत खलाटे यांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)वादळात झाड कोसळल्याने दोन बैल जखमीचामोर्शी : तालुक्यातील दोटकुली येथे गुरूवारी रात्री झालेल्या जोरदार वादळामुळे झाड कोसळून शेतकरी रवींद्र चुधरी यांचे दोन बैल जखमी झाल्याची घटना घडली. शेतकरी रवींद्र चुधरी यांनी आपल्या राहत्या घरालगत असलेल्या गुरांच्या गोट्यात आपले गुरे, ढोरे व बैल चारापाणी करून बांधून ठेवले होते. दरम्यान झालेल्या अवकाळी वादळी पावसामुळे घराशेजारचे झाड कोसळल्याने दोन्ही बैल जखमी झाले. या बैलाची किमत ५० हजार रूपये आहे. घराचेही नुकसान झाले. त्यामुळे शासनाने तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी पं.स. सदस्य प्रमोद भगत यांनी केली आहे. नुकसानीची पाहणी करताना पं.स. सदस्य प्रमोद भगत, दोटकुलीचे सरपंच बोदलकर, उपसरपंच जानकीराम धोबो, कवडू पुटकमवार, बंडू चुधरी, सतीश पुटकमवार उपस्थित होते.