शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

जूनपासून कापूस खरेदी बंद?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 05:00 IST

सन २०१९-२० या चालू वर्षात कापसाला भाव न मिळणाºया नगदी उत्पन्नाचा लाभ घेण्यासाठी हजारो शेतकरी धानाऐवजी कापसाचा पेरा वाढविला होता. त्यामुळे चामोर्शी तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यावर्षी कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड करून उत्पादन घेतले. सुदैवाने चामोर्शी तालुक्यात अनखोडा येथील जिनिंग फॅक्टरी व कापूस खरेदी केंद्र सुरू झाल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.

ठळक मुद्देहजारो क्विंटल कापूस पडून : जिल्हा प्रशासनासमोर कापूस खरेदीचे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव कापूस खरेदी केंद्र असलेल्या चामोर्शी तालुक्याच्या अनखोडा येथील आस्था जिनिंग व प्रेसींग फॅक्टरी १ जूनपासून बंद होणार आहे. विक्रीअभावी अद्यापही कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या घरी हजारो क्विंटल कापूस पडून आहे. परिणामी शेतकरी चिंतेत सापडला आहे. येथील खरेदी केंद्र बंद होणार असल्याने जिल्हा प्रशासनासमोर कापूस खरेदीचे आव्हान उभे राहणार आहे.सन २०१९-२० या चालू वर्षात कापसाला भाव न मिळणाऱ्या नगदी उत्पन्नाचा लाभ घेण्यासाठी हजारो शेतकरी धानाऐवजी कापसाचा पेरा वाढविला होता. त्यामुळे चामोर्शी तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यावर्षी कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड करून उत्पादन घेतले. सुदैवाने चामोर्शी तालुक्यात अनखोडा येथील जिनिंग फॅक्टरी व कापूस खरेदी केंद्र सुरू झाल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. यापूर्वी उत्पादक इतर जिल्ह्यात कापूस नेऊन त्याची विक्री करीत होते. परंतु अनखोडा येथील कापूस खरेदी केंद्रामुळे शेतकºयांना फेडरेशनच्या कापूस खरेदीचा लाभ मिळत होता.१७ डिसेंबर २०१९ पासून अनखोडा येथील जिनिंग फॅक्ट्रीमध्ये सुरू असलेली फेडरेशनची कापूस खरेदी कोरोच्या प्रादुर्भावामुळे बंद होती. त्यानंतर गडचिरोली जिल्हा कोरोनाबाबत ग्रीन झोनमध्ये असल्याने २२ एप्रिलपासून अल्प प्रमाणात अनखोडा येथे कापूस खरेदी सुरू करण्यात आली. सोमवारी व मंगळवारी केवळ २० गाड्या इतकाच कापूस खरेदी सुरू करण्यात आली. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पुढे तीन दिवस कापूस खरेदी केली जात आहे.सदर कापूस खरेदी केंद्र बंद झाल्यानंतर चामोर्शी तालुक्यासह जिल्ह्यातील कापूस उत्पादकांना आपला कापूस पर जिल्ह्यात व राज्यात न्यावे लागणार आहे.संचालकांनी मागितली फॅक्टरी बंदची परवानगीकोविड-१९ चा प्रादुर्भाव व जिनिंग फॅक्टरीमध्ये कामावर असलेले प्रेस ऑपरेटर, जिनिंग फिडर आदी तंत्रज्ञ व इतर कामगार गावाकडे जाण्याची संचालकांना परवानगी मागत आहेत. त्यामुळे जिनिंग फॅक्टरी चालविण्यास अडचण येत आहे. याशिवाय जून महिन्यात पावसाळ्याला सुरूवात होणार असल्याने कापसाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मे पर्यंत कापूस खरेदी प्रक्रिया सुरू राहिल एवढेचा कापूस खरेदी करावा. पुढील महिन्यात शेतीच्या कामाला सुरूवात होणार असल्याने स्थानिक मजूर उपलब्ध होऊ शकणार नाही. ही सर्व कारणे बघता अनखोडा येथील जिनिंग फॅक्टरी बंद करण्याची परवानगी संचालकांनी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविली आहे.

टॅग्स :cottonकापूसMarket Yardमार्केट यार्ड