पल्स पाेलिओ माेहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:50 IST2021-02-05T08:50:34+5:302021-02-05T08:50:34+5:30

गडचिराेली : ३१ जानेवारी राेजी जिल्हाभरात पल्स पाेलिओ माेहीम राबविण्यात आली. या माेहिमेला जिल्हाभरात चांगला प्रतिसाद मिळाला. पहिल्याच दिवशी ...

Spontaneous response to Pulse Paleo Mahime | पल्स पाेलिओ माेहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

पल्स पाेलिओ माेहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

गडचिराेली : ३१ जानेवारी राेजी जिल्हाभरात पल्स पाेलिओ माेहीम राबविण्यात आली. या माेहिमेला जिल्हाभरात चांगला प्रतिसाद मिळाला. पहिल्याच दिवशी ९५ टक्केपेक्षा अधिक बालकांना पाेलिओ डाेस पाजण्यात आले. देशातील एकही बालक पाेलिओने ग्रस्त राहू नये, यासाठी मागील अनेक वर्षांपासून पल्स पाेलिओ माेहीम देशभरात राबविली जात आहे. जिल्ह्यातील एकही बालक पाेलिओ डाेसपासून वंचित राहू नये, यासाठी आराेग्य विभागाने सुरूवातीपासूनच नियाेजन केले हाेते. पाेलिओ डाेस देण्यासाठी जिल्हाभरात २ हजार १४२ बूथ ठेवण्यात आले. ० ते ५ वयाेगटातील बालके या याेजनेचे लाभार्थी आहेत. प्रत्येक बालक पाेलिओ डाेस घेण्यासाठी यावा, यासाठी अंगणवाडी शिक्षिकेने पहिल्या दिवशीच पालकांना सूचना केली हाेती. त्यामुळे सकाळपासूनच पालक आपल्या पाल्याला घेऊन पाेलिओ केंद्रावर येत असल्याचे दिसून येत हाेते.

तालुका आराेग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी इतर विभागांचे अधिकारी यांच्यामार्फत पाेलिओ माेहिमेचा शुभारंभ करण्यात आला. ९५ टक्केपेक्षा अधिक बालकांना पाेलिओची मात्रा देण्यात आली आहे. काही बालके सुटली असल्यास त्यांचा शाेध घेऊन त्यांना पाेलिओची मात्रा दिली जाणार आहे. आराेग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका प्रत्येक घरी जाऊन बालकाने पाेलिओ डाेस घेतला किंवा नाही, याची शहानिशा करणार आहेत. तसेच बसस्थानक, मुख्य चाैक व सार्वजनिक ठिकाणी स्टाॅल लावले जाणार आहेत.

Web Title: Spontaneous response to Pulse Paleo Mahime