सिंचन विहीर कामाला गती द्या

By Admin | Updated: April 5, 2017 01:25 IST2017-04-05T01:25:13+5:302017-04-05T01:25:13+5:30

आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आ. क्रिष्णा गजबे यांनी पोटेगाव व विसोरा येथे भेट देऊन या ठिकाणी सुरू

Speed ​​up the irrigation well | सिंचन विहीर कामाला गती द्या

सिंचन विहीर कामाला गती द्या

क्रिष्णा गजबे यांचे निर्देश : पोटगाव, विसोरात बांधकामाची पाहणी
देसाईगंज : आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आ. क्रिष्णा गजबे यांनी पोटेगाव व विसोरा येथे भेट देऊन या ठिकाणी सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी केली.
मागेल त्याला विहीर योजनेंतर्गत देसाईगंज तालुक्यातील पोटगाव येथे अनेक सिंचन विहिरी मंजूर करण्यात आल्या आहेत. शेतीची कामे आटोपताच आता सिंचन विहिरींच्या खोदकामाला सुरुवात झाली आहे. आ. क्रिष्णा गजबे यांनी मंगळवारी पोटगाव येथील जनाबाई हुमने यांच्या विहीर बांधकामाची पाहणी केली. त्याचबरोबर विसोरा येथे स्थानिक आमदार निधीतून हातपंपाचे खोदकाम केले जात आहे. या हातपंपाचीही पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत गावातील नागरिक तसेच भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. गावकऱ्यांनी गावातील पाणीटंचाई तसेच पांदण रस्त्याच्या समस्या आ. क्रिष्णा गजबे यांच्यासमोर मांडल्या. रोहयोची कामे सुरू करण्यासाठी संबंधित प्रशासनाला निर्देश द्यावेत, अशीही मागणी आ. क्रिष्णा गजबे यांच्याकडे गावातील नागरिकांनी केली. यासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Speed ​​up the irrigation well