शिक्षकांच्या समस्या सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 05:00 AM2020-06-06T05:00:00+5:302020-06-06T05:00:46+5:30

अनुदानास पात्र घोषित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांना वेतन अनुदान देण्यात यावे, उच्च माध्यमिक शाळांतील २००३ ते २०१९ या कालावधीतील प्रस्तावित नैसर्गिक वाढीच्या पदांना शासन मान्यता देऊन वेतन अनुदान द्यावे, ८ हजार संगणक शिक्षक-निदेशकांना सेवेत पूर्ववत रुजू करणे आदी मागण्यांचा समावेश आहे.

Solve teacher problems | शिक्षकांच्या समस्या सोडवा

शिक्षकांच्या समस्या सोडवा

googlenewsNext
ठळक मुद्देचामोर्शीत शिक्षक संघटनेचे बिडीओ व बीओला निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : शिक्षक व शाळांच्या प्रलंबित समस्या मार्गी लावण्यात याव्या, अशी मागणी महाराष्टÑ राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात चामोर्शी येथे पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी नितेश माने व गटशिक्षणाधिकारी नरेंद्र म्हस्के यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष संतोष सुरावार, अविनाश तालापल्लीवार, घनश्याम मनबत्तुलवार, चंद्रकांत बुरांडे, अतुल सुरजागडे, सागर आडे, दिलीप तायडे, जयंत बांबोडे, दिलीप नैताम, राजू वेलादी, अभिजीत साना, शिरीष इरावार, प्रदीप भुरसे आदी उपस्थित होते. संघटनेच्या वतीने गुरूवारी अन्नत्याग आंदोलन करून मागण्यांचे निवेदन अधिकाऱ्यांना देण्यात आले.
अनुदानास पात्र घोषित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांना वेतन अनुदान देण्यात यावे, उच्च माध्यमिक शाळांतील २००३ ते २०१९ या कालावधीतील प्रस्तावित नैसर्गिक वाढीच्या पदांना शासन मान्यता देऊन वेतन अनुदान द्यावे, ८ हजार संगणक शिक्षक-निदेशकांना सेवेत पूर्ववत रुजू करणे आदी मागण्यांचा समावेश आहे.

Web Title: Solve teacher problems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Teacherशिक्षक