शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

आतापर्यंत दोनच अस्थायी डॉक्टर रूजू

By admin | Updated: February 3, 2016 01:27 IST

गडचिरोली जिल्ह्यातील उपजिल्हा व ग्रामीण रूग्णालयात रिक्त असलेल्या ठिकाणी डॉक्टरांची नियुक्ती करण्यासाठी गडचिरोली ....

दोन दिवस उरले : आरोग्य सेवेचा प्रश्न कायमच; १९ डॉक्टर रूजू होतील काय?अहेरी : गडचिरोली जिल्ह्यातील उपजिल्हा व ग्रामीण रूग्णालयात रिक्त असलेल्या ठिकाणी डॉक्टरांची नियुक्ती करण्यासाठी गडचिरोली येथे २८ जानेवारीला विभागीय आयुक्तांच्या उपस्थितीत डॉक्टर उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. पात्र ठरलेल्या २१ अस्थायी डॉक्टरांची कंत्राटी पध्दतीवर नियुक्ती करण्यात आली. मात्र पाच दिवसांत केवळ दोन अस्थायी डॉक्टर रूजू झाले आहेत. त्यामुळे आरोग्य सेवेतील रिक्त पदाचा प्रश्न कायमच आहे. गडचिरोली जिल्ह्यात तीन उपजिल्हा व आठ ग्रामीण रूग्णालये आहेत. अहेरी उपजिल्हा रूग्णालयावर पाच तालुक्यातील आरोग्य सेवेचा भार पडत आहे. मात्र येथे केवळ तीनच डॉक्टर कार्यरत आहेत. भूलतज्ज्ञ, अस्थीरोगतज्ज्ञ व अन्य डॉक्टर मिळून अहेरीच्या रूग्णालयात डॉक्टरांची सहा पदे रिक्त आहेत. अहेरी उपजिल्हा रूग्णालयासाठी मुलाखतीनंतर तीन अस्थायी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना मुलाखतपत्रही देण्यात आले आहे. मात्र नक्षलप्रभावित जिल्ह्यात डॉक्टर सेवा देण्यास तयार होत नसल्याने डॉक्टरांची पदे रिक्तच आहेत. नियुक्ती झालेले उर्वरित १९ डॉक्टर रूजू होतील काय, असा प्रश्न आहे. (तालुका प्रतिनिधी)