दाेन्ही प्राथमिक आराेग्य केंद्रांची सेवा अस्थिपंजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:50 IST2021-02-05T08:50:41+5:302021-02-05T08:50:41+5:30

जाेगीसाखरा : आरमाेरी तालुक्यातील जाेगीसाखरा व पळसगाव येथील आराेग्यवर्धिनी केंद्रांमधील आराेग्य सेविकांची बदली झाल्यापासून येथे अन्य आराेग्य सेवकांची नियुक्ती ...

Skeleton services to both primary health centers | दाेन्ही प्राथमिक आराेग्य केंद्रांची सेवा अस्थिपंजर

दाेन्ही प्राथमिक आराेग्य केंद्रांची सेवा अस्थिपंजर

जाेगीसाखरा : आरमाेरी तालुक्यातील जाेगीसाखरा व पळसगाव येथील आराेग्यवर्धिनी केंद्रांमधील आराेग्य सेविकांची बदली झाल्यापासून येथे अन्य आराेग्य सेवकांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. यामुळे दाेन्ही केंद्रातील आराेग्य सेवेवर परिणाम हाेत आहे.

जाेगीसाखरा येथील आराेग्यसेविका वाळके व पळसगाव केंद्राच्या आराेग्यसेविका मडावी यांची बदली जून २०१९मध्ये झाली. तेव्हापासून प्रशासनाने या दाेन्ही आराेग्य केंद्रांमध्ये नवीन आराेग्य सेविकांची नियुक्ती केलेली नाही. काेराेना महामारीच्या काळात या दाेन्ही केंद्रांमध्ये केवळ कंत्राटी आराेग्यसेविका, आशा सेविका यांच्यावरच रुग्णसेवेचा भार येऊन पडला आहे. नियमित आराेग्यसेविका नसल्यामुळे गृहभेटी, रुग्णांना घरपाेच औषध वाटप आदी कामे बंद पडली आहेत. परिसरातील १५ ते २० गावांमधील रुग्ण या दाेन्ही केंद्रात औषधाेपचारासाठी येतात. मात्र, येथील रिक्त पदांमुळे रुग्णांना याेग्य उपचार मिळत नाहीत. येथील रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: Skeleton services to both primary health centers