शहरं
Join us  
Trending Stories
1
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
2
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
3
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
4
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
5
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
6
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
7
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
8
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
9
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
10
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
11
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
12
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
13
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
14
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
15
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
16
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
17
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
18
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
19
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
20
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

बैलबंडी व कारसह सहा लाख सात हजारांची दारू जप्त

By admin | Updated: July 7, 2015 01:22 IST

सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली येथे तीन लाख सात हजारांची दारू बैलबंडीतून आणताना तर देसाईगंज तालुक्यात ...

आसरअल्ली व एकलपुरात कारवाई : आसरअल्लीत दारू गाळण्याच्या साहित्याची विक्री वाढली
गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली येथे तीन लाख सात हजारांची दारू बैलबंडीतून आणताना तर देसाईगंज तालुक्यात एकलपूरजवळ कारमधून गोंदिया जिल्ह्यात कारसह तीन लाखांची दारू आणताना पोलिसांनी पकडली.
तेलंगणा व महाराष्ट्र सीमेजवळ सिरोंचा तालुक्यात असलेल्या आसरअल्ली पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मोटला टेकडा येथे बैलबंडीतून अवैधरित्या दारू आणत असताना तीन आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ३ लाख ७ हजार रूपयांचा माल जप्त करण्यात आला.
मोटला टेकडा येथून आसरअल्लीकडे बैलबंडीने दारू आणत असताना हिरामल्लू बोतय्या भिमकरी, चंद्रम अर्जना चौधरी, अंकलू बापू दाते, रा. सर्व आसरअल्ली यांना ताब्यात घेण्यात आले. तर चौथा इसम गणेश चंद्रय्या पाले हा अंधाराचा फायदा घेऊन पसार झाला. या तीन आरोपींना अटक करून बैलबंड्या व विदेशी दारू ३ लाख ७ हजार रूपयांचा माल जप्त करण्यात आला. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी पवार व ठाणेदार खाटपे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक नागराज बिराजदार, पोलीस हवालदार दिलीप इनमुलवार, पोलीस शिपाई हेमंत राऊत, शुक्राचार्य गवळी यांनी पार पाडली. आसरअल्ली परिसरात गुळाची तस्करी वाढलेली असून येथील काही सावकार गुळ व दारू बनविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू अवैधरित्या पुरवठा करीत आहे.
तर दुसऱ्या एका कारवाईत येथील दारुबंदी पथकाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी सकाळी देसाईगंज तालुक्यातील एकलपूर येथे सापळा रचून गोंदिया जिल्ह्यातून येणाऱ्या दीड लाखांच्या दारुसह ३ लाख रुपये किंमतीचे चारचाकी वाहन जप्त केले. याप्रकरणी चंदर पुतुलाल जाट, सतीश विक्रम अहेरवार दोघेही रा. जबलपूर यांना अटक करण्यात आली असून, गोंदिया येथील दारु दुकानमालक व कानपूर दिलीप जाट यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. देसाईगंज तालुक्यातील गौरनगर, अरुणनगरमार्गे गोंदिया जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात अवैधरित्या दारु आणण्यात येत असल्याची माहिती मिळताच जिल्हा दारुबंदी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक विनायक कोळी यांच्या नेतृत्वातील कर्मचाऱ्यांनी सोमवारी सकाळी एकलपूर फाट्याजवळ सापळा रचला.
यावेळी समोरुन येणारी पांढऱ्या रंगाची चारचाकी कार गाडी थांबवून तिची तपासणी केली असता, त्यामध्ये टँगो पंच कंपनीची १ लाख ४२ हजारांची देशी दारु, रोख ६ हजार रुपये आढळून आले. पोलिसांनी या दारुसह ३ लाख रुपये किमतीची कार गाडी जप्त केली. याप्रकरणी वाहनातील चंदर पुतुलाल जाट व सतीश विक्रम गहेरवार यांना ताब्यात घेण्यात आले. ही दारु गोंदिया जिल्हयातील दारु दुकानाच्या मालकाकडून आणली असून, ती चंद्रपूर येथील कानपूर दिलिप जाट याच्या सांगण्यावरुन चंद्रपूरला नेण्यात येत होती, असे दोघांनी सांगितले. चारही जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. सदर कारवाई विनायक कोळी यांनी पार पाडली. (जिल्हा प्रतिनिधी)