शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
2
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
3
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
4
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
5
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
6
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
7
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
8
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
9
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
10
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
11
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
12
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
13
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
14
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
15
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
16
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
17
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
18
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
19
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
20
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

बंद एटीएमचा गडचिरोली बाजारपेठेला फटका

By admin | Updated: November 10, 2015 02:01 IST

दिवाळी सणाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाजारपेठ ग्राहकांनी फुलली आहे.

दिवाळीच्या तोंडावर : एसबीआयच्या एटीएमवर ग्राहकांचा भार
गडचिरोली : दिवाळी सणाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाजारपेठ ग्राहकांनी फुलली आहे. मात्र या बाजारपेठेला रविवारी व सोमवारी सलग दोन दिवस बंद असलेल्या एटीएमचा चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे बँक प्रशासनाविषयी नागरिकांसह दुकानदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
दिवाळी हा सर्वात मोठा सण असल्याने या सणाला मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. दिवाळीच्या या हंगामाचा फायदा उचलण्यासाठी दुकानदारवर्ग मागील एक महिन्यापासूनच तयारी करतात. दिवाळीसाठी लागणारे विविध प्रकारचे साहित्य दुकानामध्ये विक्रीसाठी आणून ठेवतात. रविवारपासून शाळांना दिवाळीच्या सुट्या लागल्या आहेत. त्यामुळे बच्चे कंपनीची गर्दी बाजारपेठेत वाढली आहे.
दुकानातून कोणतीही वस्तू खरेदी करायची झाल्यास ग्राहकाचे पाय आपोआप बँकेच्या एटीएमकडे वळतात. बँकांनी कार्यालयातील भार कमी करण्यासाठी सर्वच ग्राहकांना एटीएम कार्डचे वितरण केले आहे. त्यामुळे ग्राहक सर्वप्रथम एटीएमकडे फिरकत होते. मात्र शहरातील बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ महाराष्ट्र, युनियन बँक आदी बँकांचे बहुतांश एटीएम बंद होते. केवळ स्टेट बँक आॅफ इंडियाचेच एटीएम सुरू होते. त्यामुळे ग्राहकांची गर्दी एसबीआयच्या एटीएमसमोर वाढली होती. सकाळपासूनच या एटीएमसमोर ग्राहकांची गर्दी वाढली होती. एक तास लाईनमध्ये लागल्यानंतर एटीएममधून पैसे काढायला मिळत होते. काही ग्राहकांनी तर रांगेमध्ये लागण्याऐवजी खरेदी लांबणीवर टाकली. याचा फटका बाजारपेठेला बसला. दुकानदारांनीही बँकांच्या या गलथान कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दिवाळीच्या कालावधीत बँकेला शुक्रवार वगळून चार दिवसांच्या सुट्या येत आहेत. याही कालावधीत ग्राहकांची गैरसोय होणार आहे. (नगर प्रतिनिधी)