शिवसेनेकडून ग्रामीण रुग्णालयाला २५ सिलिंडर ऑक्सिजन पुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:37 AM2021-05-09T04:37:46+5:302021-05-09T04:37:46+5:30

दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे कोरोना रुग्णांना उपचारासोबतच ऑक्सिजनची आवश्यकता असते. ही बाब लक्षात घेऊन शिवसेनेने देसाईगंजच्या ग्रामीण रुग्णालयाला ...

Shiv Sena supplies 25 cylinders of oxygen to rural hospital | शिवसेनेकडून ग्रामीण रुग्णालयाला २५ सिलिंडर ऑक्सिजन पुरवठा

शिवसेनेकडून ग्रामीण रुग्णालयाला २५ सिलिंडर ऑक्सिजन पुरवठा

Next

दिवसेंदिवस कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे कोरोना रुग्णांना उपचारासोबतच ऑक्सिजनची आवश्यकता असते. ही बाब लक्षात घेऊन शिवसेनेने देसाईगंजच्या ग्रामीण रुग्णालयाला २५ सिलिंडर ऑक्सिजनचा पुरवठा केला.

शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल यांनी संपूर्ण जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयांना ऑक्सिजन सिलिंडर देण्याची मोहीम हाती घेतली आहे. याचाच एक भाग म्हणून ६ मे राेजी देसाईगंज ग्रामीण रुग्णालयाला २५ सिलिंडर आक्सिजन पुरवठा केला. यापुढेही १०० सिलिंडर ऑक्सिजन पुरवठा करण्याचा त्यांचा मानस आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मोहीम राबविण्यात येत आहे. यामुळे तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी मदत हाेणार आहे. ग्रामीण रुग्णालयाला याप्रसंगी माजी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, भरत जोशी, अविनाश गेडाम, नंदू चावला, विकास प्रधान, अनिल उईके तसेच ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर डाॅ. प्रणय कोसे, सचिन शेळके व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Shiv Sena supplies 25 cylinders of oxygen to rural hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.