सातबारा जुन्याच पद्धतीने देण्याची मागणी

By Admin | Updated: June 5, 2015 01:37 IST2015-06-05T01:37:58+5:302015-06-05T01:37:58+5:30

आॅनलाईन सातबारा देण्याच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

Seventh-year old demand | सातबारा जुन्याच पद्धतीने देण्याची मागणी

सातबारा जुन्याच पद्धतीने देण्याची मागणी

एटापल्ली : आॅनलाईन सातबारा देण्याच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे पारंपारिक पद्धतीनेच सातबारा देण्यात यावा, अशी मागणी युवा व्यापारी संघटनेच्या वतीने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
सहा महिन्यांपासून सातबारा, फेराफेर, नकाशा आॅनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिले जात आहेत. मात्र अजूनपर्यंत बहुतांश सातबारे व्यवस्थित अपलोड करण्यात आले नाही. परिणामी चुकीचे सातबारे शेतकऱ्यांच्या हातात मिळत आहेत. त्यामुळे शेतकरीवर्ग त्रस्त झाला आहे. काम पूर्ण होईपर्यंत पारंपारिक पद्धतीनेच सातबारे देण्यात यावे, अशी मागणी केली आहे. तालुक्यातील बहुतांश ठिकाणी इंटरनेटची सुविधा असल्याने आॅनलाईन पद्धतीने सातबारा काढण्यास नागरिकांना अडचण जात असल्याचे निवेदनात म्हटले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Seventh-year old demand