शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी सुरू

By admin | Updated: April 9, 2017 01:23 IST

‘सर्वांसाठी घरे’ या संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची गडचिरोली शहरात नगर पालिकेतर्फे

डीपीआर तयार होणार : मुख्याधिकाऱ्यांनी दिले आदेश गडचिरोली : ‘सर्वांसाठी घरे’ या संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची गडचिरोली शहरात नगर पालिकेतर्फे अंमलबजावणी सुरू झाली आहे. या संदर्भातचे आदेश मुख्याधिकारी निपाने यांनी रामदेवबाबा चॅरिटेबल सोसायटी नागपूरला दिले आहे. दुसऱ्या टप्प्यातील घरकूल बांधकामाचा डीपीआर तयार करून कृती आराखडा तयार होणार आहे. गडचिरोली शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबांना या योजनेंतर्गत घरकुलाचा लाभ देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही महत्त्वकांक्षी योजना कार्यान्वित केली आहे. गडचिरोली पालिकेतर्फे पहिल्या टप्प्यांतर्गत १ हजार ८ घरकुलांचा अंतिम प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. त्यापूर्वी रामदेवबाबा चॅरिटेबल सोसायटीतर्फे शहरातील सर्व वार्डात सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये किती कुटुंबांकडे हक्काचे घर नाही, कोणत्या कुटुंबाला घरकुलाची आवश्यकता आहे. याबाबतचा संपूर्ण तपशील तयार करण्यात आला. त्यानंतर चॅरिटेबल सोसायटीने डीपीआर तयार करून तो नगर पालिका प्रशासनाकडे सादर केला. नगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेत घरकुलाच्या प्रस्तावास मंजुरी प्रदान करण्यात आली. त्यानंतर १ हजार ८ घरकुलांचा अंतिम मंजुरीसाठी कृती आराखड्यासह म्हाडाकडे सादर करण्यात आला आहे. येत्या काही दिवसात पहिल्या टप्प्यातील प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता पालिका प्रशासनाने वर्तविली आहे. पहिल्या टप्प्यात गोकुलनगर व विवेकानंद नगर भागातील लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात घरकुलाचा लाभ कुटुंबांना देण्यासाठी पालिका प्रशासनाने प्रयत्न चालविले आहे. पालिकेचे मुख्याधिकारी कृष्णा निपाने यांनी दुसऱ्या टप्प्याचा कार्यारंभ आदेश रामदेवबाबा चॅरिटेबल सोसायटीला २ एप्रिल २०१७ रोजी दिला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत गडचिरोली शहराचे सर्वेक्षण करून प्रस्ताव तयार करावा तसेच त्यानंतर शासनाची मंजुरी मिळण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही पार पाडावी, असे संस्थेला दिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे. पालिकेच्या सर्वसाधारण सभेने ३१ फेब्रुवारी रोजी ठराव पारित करण्यात आला आहे. (नगर प्रतिनिधी)