शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांचा आत्मदहनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2020 5:00 AM

यासंदर्भात आरोग्य सेवा कर्मचारी महासंघाच्या वतीने जिल्हा हिवताप अधिकाºयांना ७ जुलै रोजी निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष इरफान रहमद शेख व फवारणी कर्मचारी क्षेत्र कार्यकर्ता गजानन कोठारे यांची स्वाक्षरी आहे. निवेदनात म्हटल्यानुसार, हंगामी फवारणी कामगार हे हिवताप कार्यालयाच्या आस्थपनेवर सन १९७२ पासून फवारणीचे काम करीत आहेत.

ठळक मुद्दे..तर कामबंद आंदोलन : हिवताप अधिकाºयाकडून आश्वासनाला तिलांजली दिल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. जिल्हा हिवताप अधिकाºयांकडून अनेक वेळा दिलेल्या आश्वासनांची पूर्तताही करण्यात आली नाही. त्यामुळे त्रस्त झालेल्या हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांनी आधी कामबंद आंदोलन करून त्यानंतरही न्याय न मिळाल्यास आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.यासंदर्भात आरोग्य सेवा कर्मचारी महासंघाच्या वतीने जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांना ७ जुलै रोजी निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष इरफान रहमद शेख व फवारणी कर्मचारी क्षेत्र कार्यकर्ता गजानन कोठारे यांची स्वाक्षरी आहे. निवेदनात म्हटल्यानुसार, हंगामी फवारणी कामगार हे हिवताप कार्यालयाच्या आस्थपनेवर सन १९७२ पासून फवारणीचे काम करीत आहेत. शासन निर्णय असूनही सेवेत सामावून घेण्यात आले नाही. गेल्या २५ वर्षांपासून फवारणी कामगारांवर अन्याय होत आहे. जिल्हा हिवताप अधिकाºयांनी जुन्या फवारणी कामगारांना बंद करून नवीन कामगारांना कामावर घेण्याचा प्रकार सुरू केला आहे. परिणामी जुन्या फवारणी कामगारांवर व त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे.गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात हिवताप कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले होते. त्यावेळी हिवताप अधिकाºयांनी आश्वासन देऊन त्यांचे उपोषण उठवले. पण नंतर आपलाच शब्द पाळला नाही, असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.निवेदनातील मागण्याहंगामी फवारणी कामगारांना १९७२ पासूनची ज्येष्ठता द्यावी, २००४ पूर्वीची हंगामी फवारणी कर्मचाºयांची यादी गहाळ केली त्याबद्दल संबंधितांवर कारवाई करावी, जीआरनुसार १६९ दिवस काम देण्यात यावे, कामाचे आदेश दिल्यावर २५ लाखांचा विमा देण्यात यावा, सेवेत कायम सामावून घ्यावे, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ३० जानेवारी २०२० रोजी दिलेल्या निकालाची अंमलबजावणी करण्यात यावी आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. सदर मागण्यांचे निवेदन जिल्हा हिवताप अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकाºयांना देण्यात आले आहे.

टॅग्स :Healthआरोग्य