शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

स्काऊट, गाईडचे चाचणी शिबिर

By admin | Updated: September 21, 2015 01:25 IST

भारत स्काऊट आणि गाईड्स जिल्हा संस्था गडचिरोलीच्या विद्यमाने राष्ट्रपती पुरस्कार चाचणी शिबिर नुकतेच पार पडले.

राष्ट्रपती पुरस्कार : प्रात्यक्षिकाद्वारे दिली माहिती; विविध विषयांवर मार्गदर्शनगडचिरोली : भारत स्काऊट आणि गाईड्स जिल्हा संस्था गडचिरोलीच्या विद्यमाने राष्ट्रपती पुरस्कार चाचणी शिबिर नुकतेच पार पडले. दोन दिवसीय शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून स्काऊटचे जिल्हा प्रशिक्षण आयुक्त वाय. आर. मेश्राम, गाईडच्या जिल्हा प्रशिक्षण आयुक्त सुधा सेता, एम. एन. निंबार्ते, प्रमोद दशमुखे, कांचन बोकडे, जिल्हा चिरटणीस अजय लोंढे, सहचिटणीस वैशाली खंगार, स्काऊटचे जिल्हा संघटन आयुक्त नितेश झाडे, गाईचे संघटन आयुक्त माधुरी जवणे उपस्थित होत्या.जिल्ह्यातील पात्र ठरलेल्या स्काऊट आणि गाईड यांना राष्ट्रपती पुरस्कार चाचणी शिबिरात भरघोस यश मिळावे म्हणून विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. स्काऊट आणि गाईड यांना राष्ट्रपती पुरस्कार परीक्षेचे स्वरूप, ध्वजारोहण पद्धती, संदेशन, गणवेश, होकायंत्र दिशा, प्रावीण्य पदके, प्राथमिक उपचार, गाठींचे व बांधण्याचे प्रकार, गॅझेट, प्रात्यक्षिक आदी बाबींवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच प्रशिक्षणार्थ्यांकडून लेखी परीक्षेचा सराव घेण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना वाय. आर. मेश्राम म्हणाले, राष्ट्रपती पुरस्कार पटकाविण्याचे ध्येय प्रत्येकाने डोळ्यासमोर ठेवण्याची गरज आहे. सदर ध्येय गाठण्यासाठी शिस्त, संयम, परिश्रम, या बाबींना जीवनामध्ये महत्त्वाचे स्थान आहे. पुरस्कारासाठी स्काऊट, गाईड पात्र ठरावे या हेतूने सदर चाचणी शिबिर घेण्यात आला. यात अनेकांनी सहभाग घेतला.यावेळी मान्यवरांनीही विविध विषयांवर मार्गदर्शन केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी गडचिरोली भारत स्काऊट आणि गाईड जिल्हा कार्यालयातील सर्व विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)