शहरं
Join us  
Trending Stories
1
Gold Rate Prediction: सोने तब्बल २७ हजारांनी महाग होणार; डॉलर वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा ‘सोन्या’वर घाव
2
'नीट'ला नाट : पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचे छापे, ५ जणांना अटक; डॉक्टरांची संघटना एनटीएविरोधात सर्वोच्च न्यायालयात
3
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील युवकांना एटीएसने घेतले ताब्यात; ५७ जण रडारवर
4
Gold Silver Rate:आयात शुल्कवाढीचा झटका; सोने ८ हजार रुपये, तर चांदी २० हजारांनी महागली
5
Mhada Lottery 2026: म्हाडा घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ; आता कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येणार? 
6
11th admission: अकरावी प्रवेशावेळी तांत्रिक अडचणी, शेकडो पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप
7
संकट दारात उभे; पण कोणाकडेही उत्तर नाही; उद्योगपती उदय कोटक यांचा भारतीयांना धोक्याचा इशारा
8
पीएम मोदींसह अनेक मंत्र्यांनी केली ताफ्यात 'काट'कसर; भाजपशासित मुख्यमंत्र्यांनीही केल्या अनेक उपाययोजना
9
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
10
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
11
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
12
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
13
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
14
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
15
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
16
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
17
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
19
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
20
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांअभावी बंद पडली भीमनपायलीची शाळा

By admin | Updated: July 25, 2015 02:00 IST

जांभुळखेडा गट ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या भीमनपायली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एकही विद्यार्थी प्रवेश न घेतल्याने येथील शाळा बंद पडली आहे.

शिक्षकांचा गलथान कारभार : गावातील विद्यार्थी जातात दुसऱ्या गावी
कुरखेडा : जांभुळखेडा गट ग्राम पंचायत अंतर्गत येणाऱ्या भीमनपायली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एकही विद्यार्थी प्रवेश न घेतल्याने येथील शाळा बंद पडली आहे. विशेष म्हणजे या गावातील विद्यार्थी दुसऱ्या गावी शिक्षण घेण्यासाठी जात आहेत.
आदिवासीबहुल गाव असलेल्या भीमनपायली व आंबेटोला या दोन गावांसाठी १ जुलै २००८ पासून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने भीमनपायली या गावामध्ये प्राथमिक शाळा सुरू केली. या दोन्ही गावांची लोकसंख्या १३० च्या जवळपास आहे. दोन्ही गावे एकमेकांपासून जवळ असल्याने दोन गावांसाठी एक शाळा सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. यापूर्वी भीमनपायली येथे वस्तीशाळा होती. या शाळेचे रूपांतर नियमित शाळेत करण्यात आले. शाळेची निर्मिती झाल्यापासून २०१२ पर्यंत ही शाळा चांगल्या पद्धतीने सुरू होती. शाळेमध्ये दोन शिक्षक कार्यरत होते. मात्र २०१२ च्या शैक्षणिक वर्षात दोन शिक्षकापैकी एका शिक्षकाला प्रतिनियुक्तीवर इतर शाळेत पाठविण्यात आले. त्यामुळे भीमनपायली येथे एकच शिक्षक कर्तव्यावर होता. सदर शिक्षक सुद्धा शाळेत नियमितपणे येत नव्हता. दोन वर्षांपूर्वी हा शिक्षक सुद्धा प्रशासनाला कोणतीही पूर्वसूचना न देता सुटीवर गेला. याबाबीला दोन वर्षांचा कालावधी उलटला तरी कर्तव्यावर रूजू झाला नाही. त्यानंतर प्रतिनियुक्तीवर इतरत्र पाठविण्यात आलेल्या शिक्षकाची प्रतिनियुक्ती रद्द करून परत त्याला भीमनपायली शाळेत रूजू करण्यात घेण्यात आले.
या सर्व भानगडीत शाळा एक महिना कुलूपबंद होती. परिणामी पालकांचा शाळेवरील विश्वास उडाला. शाळा कधीही बंद पडून पाल्यांचे नुकसान होऊ शकते, ही बाब लक्षात घेऊन पालकांनी आपल्या पाल्यांना जवळपासच्या आश्रमशाळेत पाठविण्यात सुरुवात केली. परिणामी येथील विद्यार्थ्यांची संख्या रोडावू लागली.
२०१५-१६ च्या शैक्षणिक सत्रात या शाळेत एकही विद्यार्थी शिल्लक राहिला नाही व नवीन विद्यार्थ्यांनीही प्रवेश घेतला नाही. त्यामुळे ग्रामसभा व शाळा व्यवस्थापन समितीने सदर शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला व येथील शिक्षकाला आणखी दुसऱ्या शाळेत प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले. त्यामुळे शाळा आता बंद पडली आहे.
शासनाच्या गाव तिथे शाळा या धोरणाला फार मोठा धक्का बसला असून सदर शाळा पूर्ववत सुरू होण्यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सदर शाळा नियमित शाळा सुरू राहील, असा विश्वास दर्शवावा लागेल, अशी मागणी गावातील पालकांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)