शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

महिला समृध्दीने दाखविला बचतीचा मार्ग

By admin | Updated: June 29, 2015 01:59 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मार्फतीने राबविण्यात येत असलेल्या महिला समृध्दी योजनेंतर्गत सुमारे ५४ हजार महिलांनी बँक खाते काढले ....

गडचिरोली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मार्फतीने राबविण्यात येत असलेल्या महिला समृध्दी योजनेंतर्गत सुमारे ५४ हजार महिलांनी बँक खाते काढले असून या बँक खात्यामध्ये सुमारे २० कोटी रूपयांची बचतही करण्यात आली आहे. महिलांना रोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येत असल्याने अनेक महिला स्वयंपूर्ण झाले आहेत. गडचिरोली जिल्ह्याचा ५० टक्के भाग नक्षलग्रस्त व अतिशय दुर्गम आहे. या भागातील बहुतांश नागरिकांकडे बँक खाते उपलब्ध नाही. परिणामी आर्थिक व्यवहार करताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यातही महिलांच्या नावाने बँक खात्यांची संख्या अत्यंत नगण्य होतील. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने महिला समृध्दी योजना १ सप्टेंबर २०१४ पासून सुरू केली. या योजनेंतर्गत महिलांचे बँक खाते काढण्यात येत आहेत. २० जूनपर्यंत सुमारे ५४ हजार महिलांचे बँक खाते उघडण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, बहुतांश ग्रामीण व दुर्गम भागातील महिलांचे खाते उघडण्यास प्राधान्य देण्यात आले आहे. या बँक खात्यामुळे ज्या महिलांनी आजपर्यंत बँकेची पायरी चढली नव्हती, त्या महिला आता स्वत:हून आर्थिक व्यवहार करू लागल्या आहेत. आर्थिक बचतीचे महत्त्व या महिलांना कळल्याने मजुरीचा काही भाग ते स्वत:हून बचत करीत आहेत. या बँक खात्यांमध्ये सुमारे २० कोटी रूपये बचत करण्यात आले आहेत. बँकेच्या या नाविण्यपूर्ण उपक्रमामुळे महिलांची प्रगती होण्यास फार मोठी मदत झाली आहे. (नगर प्रतिनिधी)बचतीच्या दुप्पट दिले जात आहे कर्ज ज्या महिलांच्या बँक खात्याला सहा महिन्यापेक्षा अधिक कालावधी झाला आहे. अशा महिलांना कोणतेही तारण न घेता बँक खात्यातील बचतीच्या दुप्पट कर्ज दिल्या जात आहे. आजपर्यंत ५०० हून अधिक महिलांना कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. या कर्जाची परतफेड झाल्यानंतर तीन ते चारपट कर्ज दिले जाणार आहे. बँकेच्या कर्जावर अनेक महिलांनी स्वत:चा रोजगार सुरू केला आहे.