शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

समता दिंडीने दुमदुमले गडचिरोली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2015 02:05 IST

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग जिल्हा गडचिरोलीच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज

गडचिरोली : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग जिल्हा गडचिरोलीच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त शुक्रवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास येथील इंदिरा गांधी चौकातून समता दिंडी काढण्यात आली. या दिंडीला सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा बारसागडे , नामदेवराव गडपल्लीवार, नानाजी वाढई व समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी हिरवी झेंडी दाखविली. या रॅलीमध्ये वसंत विद्यालय शिवाजी हायस्कूल, स्कूल आॅफ स्कॉलर, कारमेल हायस्कूल, भगवंतराव हिंदी विद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यानंतर सकाळी ११ वाजता कॉम्प्लेक्स परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात सामाजिक न्याय दिनाचा मुख्य कार्यक्रम पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. डॉ. देवराव होळी होते. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.चे समाज कल्याण सभापती विश्वास भोवते, प्रा. दिलीप चौधरी होते. मंचावर नामदेवराव गडपल्लीवार, दलितमित्र नानाजी वाढई, सहायक आयुक्त विनोद मोहतुरे, उपप्राचार्य सुरेश डोंगे, सोपान म्हशाखेत्री, जिल्हा नियोजन अधिकारी सुटे, जि.प.चे प्रभारी समाज कल्याण अधिकारी कोलते आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी आ. डॉ. देवराव होळी म्हणाले, देशातील प्रत्येक नागरिकांना समान अधिकार, सोयीसुविधा निर्माण करून देण्याचे तसेच दीनदुबळ्या गरीब व वंचित लोकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य स्वातंत्र्यपूर्व काळात छत्रपती शाहू महाराजांनी केले. समाजातील विषमता दूर करून समाज एकसंघ व्हावा, अशी छत्रपती शाहू महाराजाची भूमिका होती. याकरिता तळागाळातील लोकांना समान संधी दिली पाहिजे. छत्रपती शाहू महाराजांची पे्ररणा समाजातील प्रत्येक घटकांनी आत्मसात केली पाहिजे, असे प्रतिपादन प्रा. चौधरी यांनी केले. यावेळी जि.प. चे समाज कल्याण सभापती विश्वास भोवते यांनीही मार्गदर्शन केले. (स्थानिक प्रतिनिधी)