गडचिरोली : गडचिरोली शहराच्या गांधी चौकातील साईमंदिर व पोर्ला येथील गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चोरी प्रकरणातील तीन आरोपींना अटक करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे.
सीसीटीव्ही कॅमेराच्या सहाय्याने पोलिसांनी या चोरी प्रकरणाचा तपास केला व या प्रकरणात सोनू पंजाब चुमडे (२६) रा. नेहरू वार्ड, मंगला अरूण बावणे रा. गडचिरोली, सिध्दार्थ सुभाष सिरसाट (२७) रा. कोटगल या तिघांना अटक केली आहे. त्यांना १४ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. २८ जूनला साईमंदिराचा कुलूप तोडून दानपेटी चोरून नेण्यात आली होती. या घटनेची मास्टर मार्इंड मंगला बावणे होती, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. राहूल खाडे यांनी दिली. मंगला सोनू व अन्य एक आरोपी यांनी मिळून मंदिरात चोरी केल्यानंतर ४ जुलै रोजी पोर्ला येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या इमारतीचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात महिला व एक युवक कैद झाले. त्या आधारावर पोलिसांनी तपास यंत्रणा फिरवून आरोपींना अटक केली आहे, अशी माहिती खाडे यांनी पत्रकार परिषदेत शुक्रवारी दिली. यावेळी ठाणेदार उमेश बेसरकर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
साईमंदिर व पोर्ला बँक चोरी प्रकरणातील आरोपी गजाआड
By admin | Updated: July 11, 2015 02:20 IST
गडचिरोली शहराच्या गांधी चौकातील साईमंदिर व पोर्ला येथील गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चोरी प्रकरणातील ....
साईमंदिर व पोर्ला बँक चोरी प्रकरणातील आरोपी गजाआड
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}