शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

पेट्र्राेल-डिझेल दरवाढीविराेधात रायुकाँचे आंदाेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:33 IST

फाेटाे कोरची : पेट्रोल, डिझेल व गॅसची सतत दरवाढ करून नागरिकांची लूट व महागाईचा आगडोंब निर्माण करणाऱ्या केंद्रातील मोदी ...

फाेटाे

कोरची : पेट्रोल, डिझेल व गॅसची सतत दरवाढ करून नागरिकांची लूट व महागाईचा आगडोंब निर्माण करणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आंदाेलनातून निषेध केला.

लॉकडाऊनच्या काळात २० हून अधिक वेळा पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ झाली होती. त्याचीच पुनरावृत्ती आता पुन्हा सुरू आहे. पेट्रोलची दरवाढ होत असल्यामुळे किमती ९१ ते ९३ रुपयांच्या घरात पोहोचल्या आहेत. ही दरवाढ अशीच सुरू राहिली, तर लवकरच पेट्रोल दराची ‘सेंच्युरी’ आणि वाहनधारकांची ‘शंभरी’ भरेल. इंधन दरवाढीच्या माध्यमातून लूट करून, देश चालविण्याचे तंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रातील सरकारने विकसित केले आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारवर जनतेची लूट करण्याचा आरोप करत विचारले की, हेच तुमचे अच्छे दिन का? कोरोना काळात संपूर्ण देश आर्थिक संकटाला सामोरे जात आहे. लोकांकडे पोट भरण्यासाठी पैसे नाहीत आणि हे सरकार जनतेला दिलासा देण्याऐवजी महागाईचं ओझं वाढवत आहे, असा आराेप कार्यकर्त्यांनी केला.

रायुकाँचे जिल्हा सरचिटणीस कुलदीप सोनकुसरे यांच्या उपस्थितीत व रायुकाँचे तालुका अध्यक्ष स्वप्निल कराडे, शहर अध्यक्ष अविनाश हुमणे व शहर कार्याध्यक्ष चेतन कराडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी युवक कार्यकर्ते आनंद पंधरे, हेमंत ढवळे, चंद्रशेखर वालदे, किशोर मडावी, वामन नंदेश्वर, राजेंद्र साहारे, दिनेश मेश्राम, विकेश उंदीरवाडे, रवी नंदेश्वर, सिद्धार्थ जांभुळकर, दीपक मोहुर्ले, बस्तर हलामी, उमरखान पठाण आदी उपस्थित होते.